महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

हॉटेल तिरू बार अ‍ॅण्ड लॉजिंग बंद करा – सचिन काळभोर

प्रतिनिधी पिंपरी – निगडी भक्ती शक्ति उद्यानाला लागूनच असलेले हॉटेल तिरु बार अ‍ॅण्ड लॉजिंग कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.

हॉटेल तिरु बार अ‍ॅण्ड लॉजिंग याठिकाणी वेश्या व्यवसाय चालवला जात असून अवघ्या १० ते १५ फुटांवर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पुतळा असून देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज ही याच ठिकाणी असल्याने पर्यटक नागरिक याठिकाणी मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात दरम्यान याठिकाणी असले घाणेरडे प्रकार चालू असल्याने नागरिकांना आणि पर्यटकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहराची मुख्य ओळख असणारे भक्ती शक्ति शिल्प आणि देशातील सर्वात मोठा राष्ट्रध्वजाचा अवमान करणारा हा सर्व प्रकार तात्काळ बंद करावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!