
प्रतिनिधी अजय विघे कोपरगाव विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा येथे दि.२१ जून हा दिवस जगभरात जागतिक योग दिन म्हणून मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येतो. योगासनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे व दैनंदिन जीवनात योगासनांचा विद्यार्थ्यांनी सराव करावा यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय गवळी सर यांनी मोठ्या उत्साहात योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. मैदानावर विद्यार्थ्यांन मध्ये योग्य अंतर ठेवून बैठक व्यवस्थेचे नियोजन केले होते. यामध्ये जवळपास ४०० विद्यार्थी व १५ शिक्षक यांनी सहभाग घेतला. शाळेतील शिक्षक श्री.नितीन शेटे सरांनी योगासनांचे फायदे तसेच प्रत्येक आसन केल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणे म्हणजे आपले शरीर निरोगी ठेवणे होय. योगाच्या माध्यमातून हेच काम केले जाते. शरीराला निरोगी कसे ठेवता येईल यासाठी योगा आपल्याला मदत करतो.शासनाच्या मार्गदर्शिकेनुसार उभ्या स्थितीतील आसने, बसून करावयाची आसने, पाठीवर झोपून करावयाची आसने व पोटावर झोपून करावयाची आसने घेतली. या प्रसंगी योगा प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी कु. करिष्मा हलवाई यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले.




