राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते प्रवीण खरात यांचे दुःखद निधन.

प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड-काळेवाडी येथील सामजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते प्रवीण खरात (वय ३७) यांचे आज राहत्या घरी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
काळेवाडी परिसरात अनेक आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, महिलांसाठी खेळ पैठणीचा, तसेच अनेक क्रीडा स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून केले होते. प्रभागातील नागरिकांसाठी मोफत दोन रुग्णवाहिका देखील अर्पण केल्या होत्या. आपल्या कामाच्या माध्यमातून अतिशय कमी काळात सामजिक आणि राजकीय जीवनात आपली छाप पाडली होती.
युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या अत्यंत जवळचे सहकारी असलेले प्रवीण खरात यांनी पिंपरी चिंचवड
शहरात बहुजन युवकांना मोठ्या प्रमाणात संघटित केले होते. त्यांच्या अश्या अकाली निधना मुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
“अतिशय प्रेमळ, मनमिळावू, लोकांच्या मदतीसाठी पुढे धावून जाणारा, प्रत्येक आंदोलनात पक्ष संघटनेच्या कामात सर्वात अग्रेसर असलेला, शिव-फुले-शाहू आंबेडकर विचारधारेचा युवक सहकारी आज आमच्या मध्ये नाही हे ऐकून मोठा धक्का बसला असून. शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवीण खरात यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे युवक शहरअध्यक्ष इम्रान शेख म्हणाले.
युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक संतोष कोकने, विनोद नढे, राहुल भोसले, शाम लांडे यांनी श्रद्धांजली व्यक्त करत प्रवीण खरात यांच्या कुटुंबाच्या दुःखात पक्ष संघटना सहभागी असल्याचे सांगितले.




