प्रविणभाऊ खरात अनंतात विलीन, शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली – युवराज दाखले

प्रतिनिधी पिंपरी – २९जुन २०२३ राहटणी – काळेवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते कालकथित प्रविणभाऊ खरात यांचे २८जुन २०२३रोजी सायंकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने राहटणी काळेवाडी परिसरात प्रामुख्याने तापकीर नगरमध्ये पोकळी निर्माण झाली.
विक्की पोटे यांच्या सारख्या शेकडो युवकांना स्वताच्या पायावर उद्योग धंद्याच्या माध्यमातून उभे करण्याचं काम प्रविणभाऊ खरात यांनी प्रामाणिकपणे केले. राहटणी काळेवाडी परिसरात शेकडो युवकांची फळी कालकथित प्रविणभाऊ खरात यांनी उभी केली, त्यांना सावरण्याची ताकद परमेश्वराने देवो अशी आई जगदंबेला साकडं शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/अध्यक्ष तथा सकल मातंग समाज समन्वयक युवराज दाखले यांनी घालून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
काळेवाडी स्मशानभूमीमध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मा. विरोधी पक्ष नेते नाना काटे, मच्छिंद्र तापकीर, मा. नगरसेवक कैलास थोपटे, संतोष कोकणे, अनंत कोर्हाळे, विनोद नढे, प्रमोद ताम्हणकर, शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश वरीष्ठउपाध्यक्ष सचिन अण्णा लिमकर, सामाजिक कार्यकर्ते सतिश भवाळ, कुणाल शिंदे, विनोद तापकीर, शशीकांत तापकीर, मनोज शिंदे,आमोल तेलंगे, चंद्रकांत तापकीर,चेतन पवार, साकी गायकवाड, युनूसभाई पठाण, दिपक जाधव, दिपक अंकुश, निलेश पेंधे, दिलीप कुसाळकर, बिल्लु यादव, आमोल कांबळे, सुनिल जंगम, यांच्यासह शेकडो सामाजिक कार्यकर्ते व हजारों नागरिक प्रविणभाऊ खरात यांच्या अंतविधीस उपस्थित होते.




