महाराष्ट्रराजकीयविशेषशहर

श्रीरंग आप्पा बारणे यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा यासाठी मोरया गोसावी यांच्या चरणी महाअभिषेक.. बाळासाहेब वाल्हेकर

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ०२ जूलै २०२३ संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय महासंसदरत्न खासदार आदरणीय श्री.श्रीरंग आप्पा बारणे. यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहर प्रमुख श्री. निलेश तरस यांच्या नेतृत्व खाली महान साधू श्री मोरया गोसावी यांच्या चरणी महाअभिषेक करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहराला आजपर्यंत कुठलेही मंत्रीपद मिळालेले नाही. यासाठी सर्वसामान्यांचे कुशल नेतृत्व राजकीय, सामाजिक , कला ,क्रीडा, शेती, सहकार, उद्योग, सांप्रदाय, अंध-अपंग यासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी.
खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांची संसदेतील कामगिरी सर्व खासदारांमध्ये कायमच अग्रणी राहिलेली आहे. जनतेच्या न्याय हक्कासाठी त्यांनी कायमच काम केले आहे. सर्वसामान्यासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांना मंत्रिमंडळामध्ये संधी देऊन महा. राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस, व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी संधी मिळावी. ही मोरया चरणी सर्व शिवसैनिकांच्या वतीने सर्व शिवसैनिकांच्या वतीने प्रार्थना केली प्रार्थना केली यावेळी शहर संघटक श्री. रवींद्र ब्रह्मे, विधानसभा प्रमुख श्री. सुरेश राक्षे, शिवसेना जेष्ठ नेते श्री. हनुमंत माळी, चिंचवड विधानसभा संघटक श्री. सुदर्शन देसले, शहर समन्वयक श्री. हेमचंद्र जावळे,उपशहर प्रमुख श्री. अंकुश कोळेकर, शिवसेना उपशहर प्रमुख पिंपरी चिंचवड श्री. मनीष श्रीवास्तव, शिवसैनिक श्री, तुकाराम कांचन, श्री. केशव सरोदे, श्री. बाळकृष्ण चिले, श्री. धीरज जाधव, श्री. कपिल लोणकर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!