गून्हामहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिकहत्या

ठाणे हादरले गोळीबारात प्रदीप पुर्णेकर यांचा दुर्दैवी मृत्यू!राजकारणात प्रचंड खळबळ…

प्रतिनिधी सतीश पाटील मुंबई दि. ०१ ऑक्टोबर २०२६ ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणात आता त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. वडिलांशी झालेल्या एका संवादाची आठवण सांगताना मुलगा राम पूर्णेकर याने काही गंभीर दावे केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, वडिलांना आधीपासूनच आपल्याविरोधात काहीतरी कट रचला जात असल्याचा संशय होता.
ठाण्यातील मनोरमा नगर येथील कार्यालयात मंगळवारी रात्री पाच जण घुसले. हल्लेखोरांनी सात राऊंड फायर केले. त्यापैकी दोन गोळ्या प्रदीप पूर्णेकर यांना लागल्या. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले. कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा गंभीर दावा काय?
राम पूर्णेकर यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी नीलकंठ इमारतीत राजेंद्र शिंदे आणि काही हल्लेखोरांची बैठक झाल्याचा त्यांना संशय आला होता. गणपती विसर्जनावेळी काही जणांना एकत्र पाहिल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर त्याने वडिलांना सावध केले होते. त्यावेळी प्रदीप पूर्णेकर यांनी, “रात्री १० नंतर बाहेर पडू नकोस, माझी गोळी तुला लागेल,” असे सांगितल्याचा दावा रामने केला.
दरम्यान, राम पूर्णेकर आणि त्यांच्या काकांनी शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्याबाबत धमकी दिल्याचा दावा रामने केला. या प्रकरणात पप्या शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही सांगितले. पप्या हा वडिलांचा जुना मित्र असल्याचा दावा करत रामने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे. काल संध्याकाळी जे.जे. हॉस्पिटलमधून शवविच्छेन करून पार्थिव शव ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात आणले होते. पंचनामा व पत्रकार परिषद शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, राजन विचारे यांनी घेतली. काल रात्री १०:३०वा. अंतिम संस्कार ठाणे, मानपाडा येथील स्मशान भूमित करण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पुर्णेकर गोरगरिबांचे चाहते होते म्हणून त्यांच्या अंतिम संस्कार व दर्शनासाठी भरपूर गर्दी होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button