आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

१२वीत कमी टक्केवारी मिळाल्याने आत्महत्येचा विचार करणाऱ्या तरुणीचे मानवता हिताय सोशल फॉउंडेशन द्वारे समुपदेशन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०८ मे २०२५ काल १२ HSC मध्ये कमी टक्केवारी मिळाल्याने आत्महत्येचा विचार करणाऱ्या तरुणीची माहिती पिंपरी पोलिस स्टेशन मार्फत मानवता हिताय सोशल फॉउंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी व उपाध्यक्षा नेहा रोकडे यांना समजली त्याच क्षणी मानवता हिताय सोशल फॉउंडेशनची टीम पिंपरी पोलिस स्टेनला पोहचली.
पिंपरी पोलीस स्टेशन येथे समुपदेशन करून त्या मूलीची समजूत काढण्यात आली असून, ती सुखरूपपणे आपल्या आईसोबत घरी परतली आहे.
यावेळी मानवता हिताय सोशल फॉउंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्षा नेहा रोकडे, सचिव रजिया शेख, विशाल वाली, पिंपरी पोलीस स्टेशनचे API संजय घाडगे, PSI अनुजा राऊत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!