महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

एक निराधार “ती” पिंपरी पोलिसांनी दिला “माझं घर आश्रमचा” आधार.. धनराजसिंग चौधरी

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ०७ जुलै २०२३ निराधार अनाथ “ती” या “ती”ला एक नाव आहे. ज्योत्स्ना खारोडे वय 19 वर्षे रा. यवतमाळ, डीग्रजची, आई वडील नाही, चुलता आहे, पण लक्ष देत नाही, एक वर्षापूर्वी लग्न झाले, चला आता तरी सूखी राजा राणीचा संसार सूरू होईल हे स्वप्न पाहत असतानाच पहिल्याच दिवशी समजले “ती” चे अहो दारू पिताहेत सारे स्वप्न भंग..
पण उमेद होती म्हणून ही बापडी लागली संसाराला पण हायरे कर्म नवरा दारुडा तर होताच पण दररोज न चूकता कोणत्याही कारणावरून मारहाण करायला लागला, कंटाळलेली “ती” त्यात मूलबाळ नाही ही खंत उराशी धरून एक दिवशी तीने यवतमाळ, डीग्रज सोडले अन रोजच्या भांडणाला कंटाळून पुण्याला निघून आली.
इकडे ना घर ना निवारा मग भटकत भटकत ती पिंपरी पोलिसांच्या नजरेस पडली. लगेच तीची चौकशी करून पिंपरी पोलीस ठाण्याने धनराजसिंग चौधरी
यांना कॉल केला.
माझं घर आश्रमचे संचालक आहेत. ते ही लगेच पिंपरी पोलिस ठाण्यत पोहचले आणि नंतर तिला हिंजवडी येथील “माझं घर आश्रम”, हिंजवडी पूणे येथे आश्रय देण्यात आला. हक्काचे घर भेटले म्हणून “ती” थोडी खूष झाली. पण मनात प्रश्नांचा काहूर होताच तरीही असंख्य संकटे डावलत ती आज एकदाची संकट मूक्त झाली. हे सांगताना शेवटी धनराजसिंग चौधरी यानी पिंपरी पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकार्‍यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!