दादा की साहेब ? पिंपरी चिंचवड मधून कोण कोण भेटणार थोरल्या पवारांना? ..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस मधे सुरू झाला. काही पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीला कोण कोण उपस्थित होते, काय ठरले बैठकीत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान मुंबईत शरद पवार यांना कोण कोण भेटणार पिंपरी चिंचवड मधे ही राष्ट्रवादीत दोन गट होणार असे सूत्रांच्या माध्यमातून समजले, गूप्त बैठक आयोजित केली होती, त्यात ठरले की थोरल्या पवारांन सोबत जायचे यात दाट शक्यता आहे. काही नेते मंडळी वेगळा मार्ग निवडतील
१) विलास लांडे, २) अरुण बोराटे, ३) राजन नायर, ४) सुनील गव्हाणे, ५) काशिनाथ नकाते, ६) देवेंद्र तायडे, ७) इम्रान शेख, ८) मयूर जगताप, ९) काशिनाथ जगताप, १०) प्रशांत सपकाळ, ११) विजय पिरंगुटे आदी पवार साहेबांनसोबत जाण्याची दाट शक्यता आहे.
आता पहावे लागेल की अध्यक्षपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडते ते ? लवकरच ते ही कळेल !
ती ही पहिली बातमी आपल्याच पोर्टलवर लवकरच पहायला मिळेल.



