Breaking news पिंपरी चिंचवड मधे राष्ट्रवादीची नविन कमिटी स्थापन.. जयंत पाटील

प्रतिनिधी आज दि. १७ जूलै २०२३ रोजी जयंत पाटील यांनी दूपारी वाय. बी. चव्हाण सेंटरला जाण्यापूर्वी पिंपरी-चिंचवडला नविन कमिटी झाल्याचे अधिकृत पत्र दिले. ते आमच्या हाती लागले यात नमूद केले आहे की पिंपरी चिंचवड शहरात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य पुढे निरंतर सुरू ठेवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहराच्या कामकाजासाठी खालील कार्यकारी समिती जाहीर करत आहोत.
पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी समिती
१) श्री. सुनिल विजय गव्हाणे, चिंचवड
२) श्री. इम्रान युनूस शेख, भोसरी
३) श्री. काशिनाथ संभाजी जगताप, भोसरी
४) श्री. प्रशांत लक्ष्मण सपकाळ, चिंचवड
५) श्री. देवेंद्र सहदेव तायडे, पिंपरी
६) श्री. मयूर भरत जाधव, चिंचवड
७) श्री. काशिनाथ विठ्ठलराव नखाते, भोसरी
८) श्री. राजन गोपाळकृष्णन नायर, पिंपरी
९) सौ. शिलाताई संदीप भोंडवे, चिंचवड
येणाऱ्या काळात वरील सर्व समिती सदस्य एकमताने पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य करतील.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांनुसार येणाच्या काळात आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य पिंपरी चिंचवड शहरात जोमाने कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा. अशा स्वरूपाचा विषय नमूद केला गेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयंत पाटीलयांच्या सहीचे हे पत्र आहे. यापूढे वरील नऊ सदस्य पिंपरी-चिंचवड मधे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामकाज पाहतील.




