०५ लाखाचे बक्षिस असलेला फरार दहशदवादी पूणे पोलिसांनी पकडला..

प्रतिनिधी पूणे (NIA) राष्ट्रीय तपास यंत्रणेला हवे असणारे आरोपी पुणे पुलिसांनी पकड़ले. (NIA) राष्ट्रीय तपास यंत्रणेला हवा असणारा आरोपी ज्याच्यावर ५ लखाचे बक्षीस घोषित आहे. असा आरोपी कोथरूड परिसर पोलिस पेट्रोलिंग पथका कडून अटक करण्यात आली आहे.
कोथरूड येथे पोलिस पेट्रोलिंग पथक प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन हे पेट्रोलिंग करते वेळी ३ आरोपी दुचाकी चोर पकड़ले. या चोरानी आजवर चोरी केलेला मुद्देमाल ताब्यात घेण्याकरिता या तीन आरोपीना ते राहत असलेल्या ठिकाणी नेण्यात आले. त्या वेळी तिनही आरोपी पळूनजाण्याचा प्रयत्न करू लागले १ आरोपी पळून जण्यात सफल झाला आहे. तर २ आरोपी नामे इमरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना पकड़ण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या घराची झड़ती घेतली असता घरातून ०१ जिवंत राउंड आणि ०४ मोबाईल व लैपटॉप जप्त करण्यात आले आहे. पुलिस तपासात हे आरोपी (NIA) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या लिस्ट वरील गुन्हेगार आहेत याच्यावर (NIA) राष्ट्रीय तपास यंत्रणा कडून ०५ लाखाचे बक्षीस घोषित आहे असे आरोपी आता पुणे पुलिसांच्या ताब्यात आहे. ही माहिती पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.




