पिं.चिं.म.न.पा.च्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत लिंक रोड एल्प्रो मॉलच्या पाठीमागील बाजूस..
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड, २१ जुलै २०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय आतापर्यंत चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ क्वीन्सटाऊन शेजारी, चिंचवड येथे कार्यरत होते, पण सदर कार्यालय आता पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील एल्प्रो मॉलच्या पाठीमागील बाजुस स्थलांतरीत झाले आहे.
‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत एल्प्रो मॉलच्या पाठीमागील बाजूस महाकाली मंदिराजवळ उभारण्यात आली असल्याने आता ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे संपुर्ण कामकाज येथून पाहिले जाणार आहे. येत्या २४ जुलैला म्हणजे सोमवारी होणारी जनसंवाद सभा याच नवीन प्रशासकीय इमारतीत पार पडणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती ब क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांनी दिली.
या पूढे “ब” क्षेत्रीय कार्यालयाचा पत्ता- “ब” क्षेत्रीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, एल्प्रो मॉलच्या पाठीमागील बाजूस, पिंपरी चिंचवड लिंक रोड, चिंचवड, पुणे- ४११०३३. असा असेल.