
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड रविवार दि: १६/०७/२०२३ रोजी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्या मार्गदशना अंतर्गत सफायर डेंटल क्लिनीक यांच्या सहकार्याने गांगोत्री पार्क, दिघी रोड भोसरी येथे मोफत दंत चिकित्सा शिबीर कॉंग्रेस पक्षाचे श्री. हरीश डोळस यांच्या कुशल सयोजंनातुन आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर मध्ये २२५ नागरीकांनी सहभाग घेऊन मोफत दंत चिकित्साचा लाभ घेतला या शिबिराचे उद्घाटन कॉंग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्ष सायलीताई नढे, साबळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मुख्यसंचालक डॉ.विलास साबळे, डॉ.सुरेखा साबळे, कॉंग्रेस कमिटीचे समन्वयक व कार्यक्रमाचे आयोजक हरिश डोळस यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना हरिश डोळस यांनी समाजात घडत असलेल्या सद्यपरिस्थितीवर खाण्या पिण्याच्या फास्टफुडचे संभाव्य धोके व यातुन घडणाऱ्या प्रसंगावर भाषण केले. तसेच डॉ. विलास साबळे यांनी परिस्थिती काल आणि आज आरोग्यासाठी आवश्यक असणारे खाद्य पदार्थ व त्यापासून होणारे नुकसान व फायदे यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नरेंद्र बनसोडे, माऊली मलशेट्टी, तेजस गवई, पांडुरंग जगताप, अकबर शेख, अभिमन्यू दहीतुले किरण नढे, अदी उपस्थित होते.
शिबीराच्या समारोपा प्रसंगी बोलताना प्रा. किरण खाजेकर सर यांनी सागीतले की सध्या वैद्यकीय उपचार व औषधे खुप महाग झालेली आहे. हा खर्च गोरगरीबाना परवडणारा नाही याची जान ठेवुन सफायर डेंटल क्लिनीक यांनी मोफत शिबीर आयोजनास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे श्री. हरीश डोळस यांना दिलेला होकार म्हणजेच “ जनसेवा प्रती ईश्वर सेवा होय.” यास उत्तर देताना सफायर डेंटल क्लिनीक प्रमुख डॉ. सौम्या साबळे-गभाले यांनी सागीतले की ऊलट शिबीराचे आयोजन केल्या बद्दल आम्ही कॉंग्रेस पक्षाचे आभारी आहोत आणि विशेष म्हणजे या शिबीरा च्या माध्यमातुन गरीब व गरजु रुग्णावर आम्हाला ऊपचार करता आले या बद्दल आम्ही खुप समाधानी आहोत .
शिबीराचा समारोप करताना शाह जमातचे अध्यक्ष मोहसिनभाई शाह यांनी सफायर डेंटल क्लिनीकचे प्रमुख व त्यांच्या सर्व स्टाफचे आभार मानले.





