वंचितच्या धरणे आंदोलनाच्या सहाव्या दिवशी पालिका आयुक्त व पीएपीएलच्या अध्यक्षांनी नियोजित रमाई स्मारक स्थळाची केली पाहणी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२१ जानेवारी २०२५ धरणे आंदोलनातून ठरवल्या प्रमाणे दि ०७ फेब्रुवारी २०२५ त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती दिनी स्मारकाच्या नियोजित जागेचे भूमिपूजन करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शहर सचिव राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वात आणि सहकार्यांन सोबत ऐतिहासिक भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक व्हावे यासाठी गेली ६ दिवस धरणे आंदोलने करत आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि पीएपीएलच्या अध्यक्षा दीपा मुधोळ यांनी ऐतिहासिक भीमसृष्टी स्मारकाला लागून असलेली त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारकाच्या जागेची संयुक्तरीत्या पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते. यावेळी माता रमाई भिमराव आंबेडकर स्मारक समिती, वंचित बहुजन आघाडीचे माजी शहर उपाध्यक्ष संतोष जोगदंड हे उपस्थित होते या आंदोलनासाठी समाजातील सर्व बंधु भगिणी यांनी जाहीर पाठिंबा दिला. याचाच हा विजय आहे. भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राधाकांत कांबळे, शहर संघटक बापूसाहेब गायकवाड, संस्कार विभागाचे रामचंद्र आचलकर, पिंपरी चिंचवड शहर भीमशाही युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे, दलित पँथर सेना संस्थाक अध्यक्ष राजू दादा सरोदे, पॅंथर युवा मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ ठोके, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शांताराम खुडे, ओबीसी संघर्ष समितीचे पिंपरी चिंचवड शहर संस्थापक अध्यक्ष आनंदा अण्णा कुदळे, रिपब्लिकन ॲक्शन फोरमचे विनोद सरवदे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष इंजि. प्रा. करण साठे, जनहिताय समभाव सेवाभावी संस्था अध्यक्ष पंजाब कटके, उत्तम पथारी हातगाडी विकास संघ महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शोभा लक्ष्मण कांबळे, तक्षशिला मित्र संघ प्राधिकरण आकुर्डी अध्यक्ष निर्मला वालकर, क्रांती युद्ध मंडळ ट्रस्ट संस्थापक फारूक इनामदार, शिवशाही व्यापार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, आदींनी जाहीर पाठिंबा दिल्या बद्दल आम्ही आपल्या सर्वांचे ऋणी आहोत असे यावेळी आंदोलन करते राजेंद्र साळवे बोलले.



