पिंपरी-चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट संघाची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी नवनाथ बी सोनवणे पिंपरी-चिंचवड, पुणे दि. १९ ऑगस्ट २०२६ P.C.M.C. Tennis Ball Cricket Association तर्फे महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा २०२६ साठी पिंपरी-चिंचवड शहराचे संघ जाहीर करण्यात आले आहेत.
ही राज्यस्तरीय स्पर्धा २१ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान नागपूर महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडचे १४ वर्षांखालील मुलांचा संघ, वरिष्ठ पुरुष संघ आणि वरिष्ठ महिला संघ असे तिन्ही संघ सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राच्या व्यासपीठावर पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व
निवड झालेल्या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळवले असून, त्यांचे हे यश पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.
पिंपरी-चिंचवडहून संघाचे २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता नागपूरकडे प्रस्थान होणार असून, संघाचे २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता पिंपरी-चिंचवड येथे आगमन अपेक्षित आहे.
P.C.M.C.Tennis Ball Cricket Association तर्फे सर्व निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील क्रीडाप्रेमी, पालक, संस्था आणि नागरिकांनी आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन व शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
असे P.C.M.C.Tennis Ball Cricket Association चे आयोजक डॉ. प्रशांत चव्हाण व सचिव श्री. मुकुंद चव्हाण यांनी या वेळी सांगीतले.
“एक शहर • एक संघ • एक स्वप्न”



