गून्हादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मणिपूर येथे झालेल्या अमानविय पाशवी कृत्याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ जुलै २०२३ मणिपूर येथे दोन महिलांवर समूहाने अमानविय पाशवी बलात्कार करून त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. ही घटना माणूसकीला काळींबा फासणारी आहे. या घटनेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सोमवार दिनांक २४ जुलै २०२३ रोजी दु. १ वा.जाहीर निषेध आंदोलन घेण्यात आले हे आंदोलन महासचिव संजीवन कांबळे व सचिव राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे तसेच प्रदेश महिला सचिव अनिताताई सावळे उपस्थित होते. यावेळी सर्वजीत बनसोडे यांनी मणिपूर येथे जो प्रकार घडला तो का व कसा घडला, याबद्दल विस्तृत माहिती दिली ते म्हणाले की मैतीे या समाजाला एस.टी. मध्ये समाविष्ट करून घेतल्यामुळे कुकी व मैती या दोन समाजामध्ये जातीवाद्यांनी दंगली भडकवल्या त्यामुळे कुकी समाजाने मैती समाजातील दोन महिलांवर कुकी समाजातील नराधमांनी पाशवी बलात्कार करून त्यांची संपूर्ण गावातून नग्न धिंड काढण्यात आली. तसेच मुलींच्या वडिलांची व नातेवाईकाची निघृण पणे हत्या करण्यात आल्या त्यामुळे या प्रकरणांमध्ये अनेक लोकांच्या हत्या झाल्या परंतु एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाल्यानंतर सन्माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच सदरील दंगल भडकली असेही त्यांनी सांगितले या प्रसंगी आंदोलनाला पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष विकी तामचीकर ,अशोक कदम, धनंजय कांबळे, भोसरी विधानसभा अध्यक्ष अनिल भारती, युवा नेते सोनू शेळके, सचिव बाबासाहेब शिवशरण, विजय ओहोळ, वाहतूक आघाडीचे इरफान नैसर्गी, ॲड. सचिन सोनवणे. जितेंद्र मोटे, संघटक सतीश गायकवाड, विष्णू सरपते, प्रवीण कांबळे, शाखा अध्यक्ष गजेंद्र कांबळे, विजय गेडाम, विशाल धुळधुळे, शिवाजी खडसे, सचिन ओव्हाळ, कुमार गावंडे, राजकुमार परदेशी, प्रकाश पाचपांडे, गणेश तुरुकमारे, भीमाताई तुळवे, मंगलाताई मुनेश्वर, संगीता लोखंडे, निर्मलाताई वालकर, मीनाताई वाघमारे , सुखदेव जानराव, सुभाष गलांडे, पंजाबराव कटके, विजय ढवळे, शिवाजी झोडगे, अजय कांबळे, बाळा सावंत, पोपट मोरे तसेच सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!