
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ‘ संभाजी भिडे हे नाव ऐकताच काही उपनावे समोर येतात समाज कंटक, अशांतता पसरवणारा, महिलाविषयी अनादर, जातीयवाद, मनुवाद, अशा अनेक वादग्रस्त गोष्टी समोर येतात. हिंदुत्ववादी विचारसरणी व स्वतःला सुशिक्षित समजणारा हा व्यक्ती नेहमी जिभेला हाड नसल्यासारखे वाटेल ते काहीही व्यक्तत्व करून समाजात हिंसाचार व अशांतता पसरविण्याच्या नेहमी प्रयत्नात असतो.
दोन दिवसापूर्वी अमरावती मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वर केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तत्व ‘गांधी यांचे वडील मुसलमान होते.’ महापुरूषांच्या बाबतीत केलेल्या अशा वादग्रस्त विधानामुळे भिडेचा जाहीर निषेध करत आहोत.
२०१८ मध्ये भिमा कोरेगाव याठिकाणी दंगल घडविण्यासाठी हाच व्यक्ती कारणीभूत आहे. त्या वेळीचे मूख्यमंत्री फडनविसांनी या मनुवादयाला वाचवण्या करिता हजारो भिमसैनिकांना गजाआड करून डांबून ठेवले होते ते आज पर्यंत बाहेर आले नाहीत त्यांची लढाई स्वता बाळासाहेब आंबेडकर नयायालयात लढत आहेत. महार रेजिमेंट बद्दल बोलून दंगल, हिंसा घडवून आणली व सर्व शांततामय वातावरण दूषित केले, अजूनही त्या घटनेचे पडसाद समाजात आहेत. वारंवार अल्पसंख्याकाच्या विरोधात बोलून हिंसा भडकविण्याच्या प्रयत्नात असतो.
स्वतःला शिवप्रताष्ठानाचा संस्थापक म्हणवून घेणार्या या व्यक्तीला महिला पत्रकाराशी कसे बोलावे याबाबत भान नाही ‘आधी टिकली लाव मगच मी तुझ्याशी बोलतो’ अशाप्रकारची अपमानित करून महिलासोबत बोलण्याची पध्दत आहे.
संभाजी भिडे हे भारतीय राजकारण व समाजातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे RSS संचालित भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असलेल्या या व्यक्तीला संभाजी महाराजांचे नाव वापरण्याचा कसला ही अधिकार नाही.
सध्या मणिपूर मध्ये चाललेल्या हिंसाचारवर सर्व देशाचे लक्ष केंद्रित आहे. त्याचे पडसाद पूर्ण भारतात पसरले आहे. त्यावर दुर्लक्ष व्हावे म्हणून RSS संचालित भारतीय जनता पार्टीच्या या व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात असे आक्षेपार्ह विधान वापरले असावे.
अशा या व्यक्तीची लवकरात लवकर अटक करण्यात आली पाहिजे व याला राज्यातूनच नव्हे तर देशातून तडिपार करायला हवे, कारण ही व्यक्ती समाजा समाजात वाद वाढवणारी जितिय तेढ निर्माण करणारी, संकूचित मनाची व विचाराची असल्याने अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकारी समिती सदस्य राजन नायर व पदाधिकारी करत आहेत. असे नायर यांनी सांगितले.



