
अमरावती, दि. २९ जूलै २०२३ वेळो वेळी वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल निंदाजनक वक्तव्य केल्याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत शुक्रवारी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती. याचप्रमाणे संपूर्ण देशात अशा प्रकारे सर्व संघटनांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
आज पिंपरी चिंचवड येथे या वक्तव्याचा निषेध म्हणून “भिम सृष्टी” येथे आंदोलन होणार आहे असे काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष कैलास कदम यांनी काल झालेल्या मणिपूर आंदोलनादरम्यान सांगीतले.



