अपघातमहाराष्ट्रविशेषशहर
पुण्यात नगर रस्त्यावर बी.आर.टी.मधे बसची समोरासमोर धडक प्रवासी जखमी, घटनास्थळी पोलीस-अग्निशमन, रुग्णवाहिकेसह पीएमपीएल-बीआरटीचे अधिकारी दाखल.

प्रतिनिधी पुणे नगर रस्त्यावर चंदननगर येथील पाचवा मैल दर्ग्यासमोर बी.आर.टी. मधे बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना काही वेळापूर्वी घडली.
या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल तसेच पीएमपीएल व बीआरटीचे अधिकारी दाखल झालेले आहेत.
पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्हीआयपी थोड्याच वेळात दाखल होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त एअरपोर्ट, नगररस्ता तसेच संपूर्ण शहरात नेमण्यात आलेला आहे.
अचानक झालेल्या या अपघातामुळे नगर रस्ता परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू असून अपघाताचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.




