मनोहर कुलकर्णी (भिडे) याचेवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शेकडो संघटना एकत्र येत महामोर्चाचे आयोजन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे) याने केलेले बेताल वक्तव्ये: संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पेक्षा मनू श्रेष्ठ होता, तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज असूच शकत नाही, जण गण मन हे आपले राष्ट्रगीत असूच शकत नाही, १५ आगस्टला काळा दिवस पाळून उपवास करावा, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केलेला आहे, महात्मा गांधी यांच्या आईच्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे, तसेच महात्मा फुले हा भडव्याच्या यादीतला आहे, असे अनेक वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे) याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे आयोजन शहरातील सर्व समविचारी संघटनेंच्या वतीने करण्यात येणार आहे.
मोर्चाची वेळ: दिनांकः गुरुवार १० ऑगस्ट,२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता.
मोर्चाचे ठिकाण : दळवी नगर चिंचवड येथून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालय प्रेम लोक पार्क चिंचवड.
तरी सर्व पुरोगामी पक्ष, पुरोगामी संघटना, सामाजिक संघटनां, यांचे पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच सामान्य नागरिक, महिला मंडळ, युवक कार्यकर्ते यांनी या मोर्चामध्ये सर्व समर्थक आणि सहकार्यांसह वेळेवर उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
मोर्चा तुमचा आमचा सर्वांचा.
हा मेसेज आपल्या मित्रांना नातेवाईकांना अवश्य पाठवा. अशी साद भिमशाही युवा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे यांनी घातली. सोबत हेही यांनी सांगीतले की मी व माझी संघटना या मोर्चाला पाठींबा देत आहोत यावेळी भारतीय रिपब्लिकन फेडरेशन पिंपरी चिंचवड शहर युवा अध्यक्ष अरुण मैराळे व नितीन कसबे, सुरज शिखरे यांनी ही जाहीर पाठिंबा दिला व उपस्थित राहू असे सांगीतले.



