आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
दापोडी येथे पिं. चिं. म. न. पा. च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.९ ऑगस्ट २०२३ क्रांती दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापूर्तीच्या पार्श्वभूमीवर ‘’माझी माती माझा देश’’ या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, उद्यान आणि वृक्षसंवर्धन विभागामार्फत सी. एम. ई दापोडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, कर्नल आशिष रायसिंघानी (कमांडर सिटीडब्लू सीएमई), अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे तसेच मंजुषा हिंगे, चंद्रकांत गावडे, सुरेश घोडे तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थित वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.




