संभाजी भिडेला अटक करा म्हणून पिंपरी चिंचवड मधील सर्व पक्ष संघटनांचा महामोर्चा पोलिस आयुक्त कार्यालयावर ..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड १० ऑगस्ट २०२३ संभाजी भिडे यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व पक्ष संघटना मिळून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयावरती मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अर्ध्यावरच अडवण्यात आला. कारण कालच मोर्चाला परवानगी नाकारली गेली असल्याने मोर्चा आडवण्यात आला. या मोर्च्यामध्ये महीला पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने व वेळोवेळी अशाच स्वरूपाचे अपशब्द देश, स्वातंत्रसैनिक, राष्ट्रगीत, महिला या व अशा संदर्भात वापरले जातात म्हणून नागरिक व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने आज विविध संघटना सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांनी यांनी मनोहर कूलकर्णी ( संभाजी भिडे ) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी यासाठी मोर्चा कढण्यात येणार होता मात्र तो मोर्चा जिथे सूरू झाला तिथेच पोलीसांनी आडवण्यात आला सकाळी आकरा वाजता या मोर्चा ला सुरुवात होणार होती मात्र पोलीसांनी मोर्चा अडवण्यात आल्यानंतर ज्या ठिकाणी सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी सर्व कार्यकर्ते आंदोलनासाठी बसले होते. नंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाला आयुक्तांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. मणिपूर मध्ये जो प्रकार घडला आहे त्यावरती पडदा पडावा म्हणून हे सरकार मनोहर कूलकर्णी ( संभाजी भिडे ) सारखा माणसाला पुढे करून काही ही बेताल वक्तव्य करायला लावत आहे का? आम्ही सर्व संघटना मिळून केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांना विनंती करत आहोत की लवकरात लवकर गुन्हे दाखल करून संभाजी भिडे यांना अटक करा नाहीतर भविष्यामध्ये जी काही वादळे उठतील त्याला जवाबदार केंद्र सरकार व राज्य सरकार राहील असा इशारा देण्यात आला. यावेळी मारुती भापकर ( सामाजिक कार्यकर्ते ), मानव कांबळे ( सामाजिक कार्यकर्ते ), देवेंद्र तायडे ( नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ), सुनीता शिंदे ( जिजाऊ बिग्रेड पुणे जिल्हा अध्यक्षा ), संजीवनी पुराणिक ( नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ), राजन नायर ( नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ), यांनी आपले विचार मांडले या वेळी सतिश काळे, काशिनाथ नखाते, आण्णासाहेब कसबे, शांताराम खूडे, विठ्ठल कळसे, भारत विठ्ठलदास, ब्रम्हानंद जाधव, बापूसाहेब गायकवाड, जितेंद्र छाबडा, बिषप प्रदिप चांदेकर, बिषप अशोक निकाळजे, बिषप मायक राज नाडार, डेविड काळे, निशिकांत चांदेकर, आण्णा पाखरे, दराडे, माऊली बोराटे, बाळासाहेब वाघमारे, ज्योती जाधव, संजिवनी पूराणिक, सुधीर मुरूडकर, राम नलावडे, संतोष रनदिवे, हौसराव शिंदे, माणिक शिंदे, सुनिता शिंदे, अरविंद जगताप, राहुल मदने, उत्तम जोगदंड, यशवंत कांबळे, अजय सिंग, सचिन पवार, असे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.





