संभाजीनगरच्या (औरंगाबाद) गंगापूर मधे आमदाराची गूंडगीरी सर्वसामान्य दहशतीत..
प्रतिनीधी- संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हाधिकारी व गंगापूरच्या तहसीलदार यांच्या समोर मागणी, गंगापूरचे गुंड प्रवृत्तीचे व वेगवेगळ्या जाती समूहात गरीब कुटूंबाना त्यांच्या मालकीच्या असलेल्या घरापासून व जमिनीपासून बेदखल करणारा आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात तत्काळ कार्यवाही करण्यात यावी.
गंगापूर तहसील मध्ये जमीन गायरान जमीन सर्वे नं.२८१/आ शिवार ते साधारण ४० ते ५० वर्षापासून कसत असलेला, जमीनी मालक हक्क असलेला सीताबाई कांचेकर, संतोष काकडे, सरोजिनी बाई मोरे, रेखाबाई मोरे, आशाबाई खराडे, बशिरा शेख, शेख चाॅद,परसराम नरवडे, शिवनाथ काळे,बाबासाहेब तुपशेंद्रे, शांताबाई राजपूत, संगीता मोरे, पोपट राजपूत, ज्ञानेश्वर माळी, सोमनाथ मोरे, गयाबाई भालेकर व इतरांना बेदखल आमदार, भारतीय जनता पार्टीचे असून भारताचे पंतप्रधान करत असलेल्या हुकूमशाहीची प्रेरणा घेऊन व भारतीय जनता पार्टी व्दारे गोरगरीब, वंचित, शोषित, मागासवर्गीय महिला, अल्पसंख्याक समाजावर वारंवार अन्याय व अत्याचार करत आहे आणि त्यांचे जगणे असह्य केले आहे.

गंगापूरचे आमदार प्रशांत बंब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बळावर व पोलिस खाते त्यांच्या पक्षाचे असल्या कारणाने, भारतीय जनता पार्टीचा धाक असल्याने गोरगरीब, शिवार गंगापूर रहिवाशांना त्रास देण्याचे काम थांबले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार.
या आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास याची पूर्ण जबाबदारी प्रशांत बंब, भारतीय जनता पार्टी व प्रशासनावर असेल. असे उपोषण कर्त्यांनी तहसिलदारांना दिलेल्या पत्रकात लिहिले आहे.




