हजरत गरीब नवाज यांच्या ८१२व्या उर्स निमित्त “अमन शांति का पैगाम” कार्यक्रम संपंन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १८ जानेवारी २०२४ सुफी संत हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती गरीब नवाज यांच्या 812 उर्स निमित्त काल ‘शाह जमात शान ऐ फकीर फाउंडेशन’ तर्फे “अमन शांति का पैगाम” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ‘सुफी सय्यद साहब’ व ‘सुफी तहसीन रजा कादरी’ यांनी सर्वांकरिता विशेष दुवा केली. यावेळी ते बोलले की सुफी संताची शिकवन मानवता, प्रेम, भाईचारा, गरीब नवाज यांच्या संदेशाचे शिकवन सांगितली यावेळी प्रमुख उपस्थिति मौलाना फिरोज अज़ीजी सिद्दीकी, मौलाना अब्दुल लतीफ नुरी, मौलाना ऐजाज, मौलाना अब्दुल्ला, तौफीक खान, हाजी गय्यासुद्दीन, रुवाब शाह व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ‘शाह जमात शान ऐ फकीर फाउंडेशनचे’ शहर अध्यक्ष अतहर शाह, मोहम्मद शाह, जाहीद शाह, अजहर शाह, नासीर मंसुरी, यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मोहसीन शाह यांनी मानले.




