देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे पुतणे दिलीपराव मुकुंदराव आंबेडकर साहेब यांचे आज पहाटे ४:०० वा. दुःखद निधन झाले.

प्रतिनिधी मूंबई आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे. दिलीपराव मुकुंदराव आंबेडकर हे सिद्धार्थ काॅलेज ऑफ आर्टस, सायन्स अँन्ड काॅमर्सचे माजी रजिस्ट्रार होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे पुतणे कालकथित मुकुंदराव आंबेडकर यांचे चिरंजीव दिवंगत दिलीपराव मुकुंदराव आंबेडकर साहेब यांचे आज पहाटे ४:०० वा. मूंबईतील हॉस्पीटल मध्ये दुःखद निधन झाले आहे. आज आंबेडकर परिवारातील आणखी एक हिरा निखळून पडला आहे. स्वभावाने अतिशय शांत मितभाषी असे हे व्यक्ती महत्व आज समाजातून हरपले आहे. आदरणीय दिवंगत दिलीपराव मुकुंदराव आंबेडकर हे राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाचे नेते देवेंद्र तायडे यांचे ते साडू होते. अंतविधी नंतर दू:खद अंतकरनाने तायडे यांनी सांगीतले.



