महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

शिवशाही व्यापारी संघ व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनंम्र अभिवादन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड शिवशाही व्यापारी संघ व राष्ट्रीय समाज पक्ष पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने काल रविवार दि.१३ ऑगस्ट २०२३ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यादेवी होळकर चौक मोरवाडी येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच जेष्ठ लेखक, रानकवी पद्मश्री ना.धो महानोर व जेष्ठ साहित्यिक लेखक प्रा. हरी नरकेसर यांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या शोकसभेचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्ष पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण मामा लेंगरे, शहराध्यक्ष भरतभैय्या महानवर, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले, उपाध्यक्ष परमेश्वर शेठ बूर्ले, प्रवक्ते अजित चौगुले, महावीर काळे , राजेंद्र घोडके, संजय नाईकवाडे, यशोदा नाईकवाडे, सुनील बनसोडे, दीपक भोजने, सदाशिव पडळकर , नागेश तित्तर, मुकूंद कुचेकर, राजाराम खांडेकर, बाळासाहेब काळे मदन जोगदंड भाऊसाहेब दगडे नितीन पिंगळे दीपक रोळे किशोर पाटील,शंकर दातीर, बंडू बुर्ले, बाळासाहेब यमगर व अन्य समाजबांधव उपस्थित होते. यावेळी लेंगरे मामा यांनी महानोर व नरके यांच्या आठवणींना उजाळा दिला.
शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने युवराज दाखले यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button