७६वा स्वातंत्र्य दिन चिखली घरकुल येथे साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड चिखली घरकुल विषयी बोलताना एका कवीच्या काही ओळी आठवतात “घर असावं घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा ” नकोत नूसती नाती” या प्रमाणे सर्व नाती जिव्हाळा जपनारे पिंपरी चिंचवड शहरामधील “घरकूल” आहे. आज स्वप्नकुंज गृहरचना सोसायटी इमारत क्र. डी ६ या ठीकाणी ७६वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड मनपाचे ‘क’ प्रभागाचे उपायुक्त मा. आण्णा बोदाडे हे प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी घरकुल रहिवाशांना खुप मोलाचं मार्गदर्शन केले. कार्यक्रमास डी. एस. एस. माजी संघप्रमुख मा. सोपानराव चव्हाण साहेब उपस्थित होते, तसेच इंग्लिश स्पीकिंगचे सुर्यवंशी, कम्युनिस्ट पक्षाचे गणेश दराडे, अपर्णा दराडे, यांनी महिलांना त्यांच्या हक्क, अधिकार व देशात वाढलेले महिलांवरील अत्याचाराचे व त्यासाठी संघटन महत्वाची आहे. हे सांगितले कवी अरुण कांबळे, सुहास घुमरे, यांनी आपले विचार व्यक्त केले, दिवसभर प्रबोधन व विविध शारीरिक खेळ, स्वातंत्र्यपर गितांचे गायन, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्यात महिला व विद्यार्थिनी तरुण तरुणी यांनी हिरीरीने भाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्विरित्या पार पाडण्या करीता स्वप्नकुंज सोसायटीचे अध्यक्ष ॲड. महेंद्रकुमार गायकवाड, मंगल पाचपुते, विजय जगताप, प्रकाश सुतार, प्रशांत साळवी, सावंत, सुरेश जाधव, अनिल अवचार, अतुल जाधव, सुखदेव खिल्लारे, प्रतिभा वाळुंजकर, सतिष पडवळकर, राजश्री यवतकर, राजु चौधरी, दातकर, अपर्णा मर्ढेकर, इत्यादीनी अपार परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरजीत गायकवाड यांनी अतिशय सुंदर प्रकारे केले. शेवटी ॲड. महेंद्रकुमार गायकवाड यांनी आभार मानले…



