महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

“जेष्ठ नागरिक दिनानिमित्त राहुलभाऊ भोसले यांनी केला जेष्ठ नागरिकांचा सन्मान”

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड २१ ऑगस्ट २०२३, जेष्ठ नागरिक दिनानिमित्त नेहरूनगर येथे नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांनी जेष्ठ नागरिकांचा सन्मान केला, यावेळी जेष्ठ नागरिक संघ, विठ्ठलनगरचे अध्यक्ष लक्ष्मण जोगदंड यांच्यासहीत बहुसंख्य सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
“जेष्ठ नागरिक यांच्याकडून मिळणारा कार्याचा अनुभव सदैव मार्गदर्शक ठरतो, जेष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवानुसार नव्या पिढीला मार्गदर्शन करत जावे.”असे प्रतिपादन राहुलभाऊ भोसले यावेळी केले.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जेष्ठ नागरिक संघांचे यासिन शेख, उत्तमराव जोगदंड, सल्लाउद्दीन शेख, शेख दाऊद, श्रावण जोगदंड, पांडुरंग सावंत, कल्याण कदम, साहेबराव इनकर, साहेबराव कदम, राजू हजारे, कल्याण वाळके यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर गवळी, दत्ता जाधव, शिवशंकर उबाळे, संजय जाधव, विनोद गायकवाड, बापू माने, मुन्ना ठाकूर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!