आदरणीय नेताओं तुम इधर उधर की बात मत करो!महंगाई, बेरोजगारी कम कब होगी, जबाब दो.. मारुती भापकर

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२८ ऑगस्ट २०२३ काल रविवार दि.२७ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जसे दिवसभर परभणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, हिंगोलीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रायगडात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे, मुंबईत स्वराज संघटनेचे छत्रपती संभाजी राजे, सातार्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले व खासदार उदयनराजे भोसले तर समारोप बीडच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आदि मंत्र्यांची भाषणे झाली. नेत्यांची ही भाषणे सर्व मराठी वाहिनीवर लाईव दाखवण्यात आली. या सर्व नेत्यांच्या भाषणात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, डाळी, तेल आदि दैनंदिन लागणारया चीज वस्तूंचे वाढलेले प्रचंड दर तसेच शेतीसाठी बी बियाणे, खते यांचे वाढलेले दर व ही महागाई, बेरोजगारी कमी करण्याबाबत दिलासा देणारा निर्णय व त्याची अंमलबजावणी कशी करणार याबाबत ठोस आश्वासन या सगळ्या नेत्यांच्या भाषणात उभ्या आडव्या महाराष्ट्राच्या जनतेला ऐकायला मिळालेली नाहीत, याची खूप खंत वाटते…
आदरणीय नेताओं आप लोग, इधर उधर की बात मत करो, महागाई बेरोजगारी कम कब होगी! इस सवाल का जवाब दो ? असा प्रश्न सामाजीक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्यकर्त्याना विचारला..



