आरोग्यमहाराष्ट्रशहरसामाजिक

पिं. चिं. म. न. पा. मधील महिला व पुरुष सफाई कामगारांना म.न.पा.ने कायमस्वरूपी सेवेत घ्यावे.. प्रल्हाद कांबळे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२८ ऑगस्ट २०२३ कामगार कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. श्री. सुरेशजी खाडे साहेब, यांच्या पिंपरी चिंचवड दौर्‍या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते व फेरीवाला हॉकर्स महासंघचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद कांबळे यांनी साफसफाई कामगारांच्या समस्या व या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेणे संदर्भात सुरेशजी खाडे यांना समक्ष भेटून पत्र दिले. पत्रात त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरेपालिकेतील दैनंदिनी महिला व पुरुष सफाई कामगारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कायमस्वरूपी सेवेत घेणेबाबत विनंती केली आहे.
या वेळी ते बोलले की पिंपरी चिंचवड शहरात
सफाई महिला व पुरुष घंटागाडी कामगारांनी साधारण २० वर्षापासून ठेकेदारी पद्धतीवर काम करीत आहेत. अशाच कामगारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कायमस्वरूपी कामावर घतलेले आहे. त्याच अटी, शर्ती व नियमावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व ठेकेदार पद्धतीने असणाऱ्या महिला व पुरुषांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कायम स्वरूपी कामावर घेण्यात यावे साफसफाई कामगार हे आपला जीव धोक्यात घालून स्त्यावरतील घाण कचरा उचलण्याचे काम करीत असताना त्यांना श्वासनश्वास व फुफुसाचा त्रास होवुन त्यांना अनेक रोगराई होवु शकते. परिणामी त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याचा पूर्णपणे विचार केला जात नाही. म्हणून आपणास विनंती आहे. महाराष्ट्र शासनाने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने साफसफाई कामगारांचा प्रत्येकी ५०,००,०००/- या रक्कमेचा विमा उतरण्यात यावा. त्यामुळे त्यांना आर्थिक सहकार्य होईल व सफाई कामगारांची आर्थिक दुर्बल परिस्थितीत सुधारणा होईल.
आज रोजी सर्व ठेकेदारांनी सर्व कामगारांना बोलावून दमदाटी करणे, सुट्टीचा पगार न देणे, स्वताच्या न्याय हक्का साठीच्या आंदोलनात गेलात म्हणून त्या दिवसाचा पगार कटींग करणे व कायमस्वरूपी कामावरून घरी पाठवू अशी धमकी देणे, अशी दमदाटी केली जात आहे, अशा पद्धतीने कामगारांची मानसिक व शारिरीक पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी भयभित झाले असून त्यांना न्याय फक्त आपणच देऊ शकता.
तरी आम्ही आपणास विनंती करतो की, आपण स्वतः याबाबत जातीने लक्ष घालून (१) दि. १६ मार्च
२०११ ते १५ मार्च २०१५ अखेर मानधनावर काम केलेल्या कालावधीतील ई.एस.आय./पी.एफ. व किमान
वेतनातील फरक देण्यात मा. आयुक्त साहेब, पिंपरी चिंचवड मनपा यांना आदेश देण्यात यावे. (२) कंत्राटी
आरोग्य कर्मचाऱ्यांना वयाच्या ६० वर्षी पेन्शन लागू करण्यात यावी. तसेच (३)आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १००% आरक्षणात घरकुल देणेबाबत सहकार्य करावे. (४) मे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सेवेत असणारे कायमस्वरूपी कामगार रस्ते नाले, साफसफाई करणाऱ्या व कचरावेचक, वाहनचालक यांना समान-काम-समान-वेतन देण्यात यावे. अशा स्वरूपाचे पत्र देण्यात आले. असे सामाजिक कार्यकर्ते व “फेरीवाला हॉकर्स महासंघचे संस्थापक अध्यक्ष” प्रल्हाद कांबळे यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!