भिमशाही युवा संघटनेची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी जाहीर.. संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे

प्रतिनिधी पिंपरी : भिमशाही युवा संघटनेची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी ३० ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. यात पिंपरी चिंचवड शहरअध्यक्ष पदी मा. प्रविण धाईजे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी मा. सुरज शिखरे, कार्याध्यक्ष सूर्यकांत जावळे, मुख्य संघटक मा. सचिन गायकवाड, मा. आबासाहेब वाघमारे, सेक्रेटरी मा. भारत वाघमारे, प्रसिद्धी प्रमुख मा. बालाजी सोनकांबळे यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र भीमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे व नितीन कसबे भिमशाही युवा संघटना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी शहरातील विविध संघटनांचे व पक्ष पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये मा. गोपाळ मोरे, शिवसेना युवा नेते, मा.राजन नायर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महासचिव महाराष्ट्र राज्य (शरद पवार साहेब), मा. धुराजी शिंदे रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, मा. शांताराम खुडे भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मा.अरूण मैराळे रिपब्लिकन फेडरेशन पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, मा.शंकर कटके, मा. विशाल वाघमारे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे भीमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




