रिपब्लिकन सेनेची पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आढावा बैठक व पक्ष प्रवेश समारंभ संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.०४ सप्टेंबर २०२३ रिपब्लिकन सेनेची पिंपरी चिंचवड शहरांमध्ये दि. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी आढावा बैठक व पक्ष प्रवेश पार पडला या वेळी प्रमुख उपस्थिती रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी काकासाहेब खंबाळकर तसेच रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरणजी घोंगडे, अध्यक्ष कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश युवराज बनसोडे, पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप रनदिवे, पुणे जिल्हा युवा अध्यक्ष गणेश चव्हाण, पुणे जिल्हा युवा महासचिव प्रशांत सोनवणे, पश्चिम युवा उपाध्यक्ष लहु आंमराळे, डोळसताई, शिंदेताई, व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सूरूवात भिमसृष्टी येथे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्यास पूष्पहार अर्पण करून व मानवंदना देवून झाली.
नियोजित कार्यक्रम हा माता सावित्रिबाई फूले हाॅल मधे सूरू झाला यात प्रथम उपस्थित पाहूण्यांचे पूष्पगूच्छ देवून सन्मान करण्यात आला.
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी काकासाहेब खंबाळकर यांचे परवानगीने पुणे जिल्हा युवा अध्यक्ष पदी सदानंद गवई व पिंपरी चिंचवड शहर युवा अध्यक्ष पदी अरुण भाऊ मैराळे यांची निवड करण्यात आली.
याच सोबत मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करण्यात आला. या बैठकीचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष धुराजी शिंदे यांनी केले.
या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




