महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी आज केली विविध प्रकल्पाची पाहणी..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १० सप्टेंबर २०२३ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्याने तयार होत असलेल्या इमारतीचे काम आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार मुदतीत पूर्ण करण्यात यावे तसेच प्रत्येक कामगार, अधिकारी कामावर असताना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी आज नव्याने तयार होत असलेल्या महापालिका नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची तसेच भक्ती शक्ती ते मुकाई चौक आणि मुकाई चौक ते भोंडवे कॉर्नर या रस्त्यांची आणि रावेत येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांची पाहणी केली त्यावेळी त्यांनी निर्देश दिले.

प्रकल्पांच्या पाहणीच्या वेळी त्यांचे समवेत सहशहर अभियंता प्रमोदओंभासे, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड,उप अभियंता विजयसिंह भोसले,कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे आणि केतकी कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी महापालिका नवीन इमारतीच्या खोदकामाची पाहणी करून प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली.

सहशहर अभियंता ओंभासे यांनी नवीन इमारतीस ३६ महिने लागणार असून सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली.

त्यानंतर अतिरिक्त आयुक्त यांनी रावेत येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांची सखोल माहिती घेतली.सह शहर अभियंता ओंभासे यांनी मुख्यत्वेकरून जमीन अधिग्रहण करण्यात झालेला विलंब यामुळे या प्रकल्पाचे काम थांबले होते परंतू आता सदर काम वेगाने सुरू असून पुढील तीन महिन्यात काम पूर्ण होईल असे सांगितले. त्यानंतर कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड यांनी रावेत येथील उड्डाण पूल ते मुकाई चौक या रस्त्यांची विकास मंजूर आराखड्यातील ४५ मीटर रुंदीप्रमाणे अद्यापही काही जागा ताब्यात नसल्याने या रस्त्याचे कामास विलंब झाल्याचे सांगितले.

त्यावर अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी या संपूर्ण
रस्त्यांची पाहणी करून माहिती घेतली आणि आपल्याला पुढील काळात ते काम तातडीने पूर्ण करायचे आहे असे सांगितले,त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून संपूर्ण प्रकल्प मार्गी लावा असे सांगितले. मुकाई चौक ते भोंडवे कॉर्नर या रस्त्याचे पदपथाचे काम वेळेत पूर्ण करा अशा सूचनाही अतिरिक्त आयुक्तांनी केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!