गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

१४ वर्षिय मुलाचे अपहरण करणाऱ्या तीन आरोपींना “गुन्हे शाखा युनिट-४” ने अडीच तासात ठोकल्या बेडया..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ सप्टेंबर २०२३
१४ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या तीन आरोपींना
“गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड” यांनी अडीच तासात ठोकल्या बेडया धारधार शस्त्र जप्त करुन अपहरण ग्रस्त मुलाची केली सुटका.
हकिगत अशी की, दिनांक- १२/०९/२०२३ रोजी सुमारे सकाळी ०७:०० वा. हिंजवडी पोलीस ठाणे हद्दितील ताथवडे येथील एका भंगार व्यवसायिकाच्या १४ वर्षाचे मुलाचे झेन गाडी मधुन आलेल्या तीन इसमांनी अपहरण केले असल्याबाबत पो.हवा./मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाल्याने व सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, व गुन्हे शाखा, युनिट-४चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे आणि सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना तात्काळ घटनास्थळी जावुन तपास करण्याचे आदेश दिले होते.
गुन्हे शाखा युनिट-४ चे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मुलाचे सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात तीन इसम हे एका निळ्या रंगाचे झेन गाडी अपहरण केलेले ठिकाणी अपहरण केलेल्या मुलास घेवुन जात असल्याचे दिसत होते. त्याच दरम्यान गुन्हे शाखा युनिट-४ने अपहरण केलेल्या मुलाचे काका यास
ताब्यात घेवुन त्याचे कडे चौकशी करुन त्याचे कडुन माहिती काढण्यास सांगितले होते. त्याच दरम्यान सदर अपहरण झालेल्या मुलांच्या काकास वेगवेगळ्या मोबाईल क्रमांका वरुन फोन करुन एका इसमाने “३० लाख रुपयाची खंडणी दे नाही तर तुमच्या मुलाचे हात-पाय तोडुन त्यास मारुन टाकतो” अशा प्रकारचा खंडणीचा फोन करत होते.
तेव्हां अपहरण करणाऱ्या इसमां बाबत मिळालेल्या बातमीदारा कडुन व पो.शि./ प्रशांत सैद यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणा वरुन अपहरण करणारे इसम हे सासवड परिसरात असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने लागलीच स.पो.नि. देशमुख, दरोडा विरोधी पथक व पो.उप.नि. रायकर, गुन्हे शाखा युनिट-४ यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन सदर ठिकाणी रवाना केली. तसेच त्यादरम्यान पो. नि. शंकर आवताडे यांनी पोलीस उपअधिक्षक बरडे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे यांचे पो.नि. अविनाश शिळीमकर, सासवड पोलिस ठाण्याचे पो.नि. जाधव, राजगड पोलिस ठाण्याचे पो.नि. आण्णा घोलप यांना देखील संपर्क करुन त्यांना सविस्तर प्रकार सांगुन आरोपींचे वर्णन सांगुन तात्काळ नाकाबंदी लावण्यास सांगितले. त्यांनतर गुन्हे शाखेच्या दोन्ही पथक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे व सासवड पोलीस ठाणे यांनी योग्य तो समन्वय साधुन तात्काळ प्रतिसाद दिल्याने आवघ्या अडीच तासात सापळा लावुन आरोपी नामे १) तेजस ज्ञानोवा लोखंडे, वय-२१ वर्षे, रा-दत्त मंदिर शेजारी, मारुंजीगाव, पुणे २) अर्जुन सुरेश राठोड, वय १९ वर्षे, रा- दत्त मंदिर शेजारी, मारुंजीगाव, पुणे ३) विकास संजय मस्के, वय-२३ वर्षे, रा. शिवार वस्ती, भुमकर चौक, पुणे. या खंडणीखोर तीन आरोपींना शिताफीने झेन गाडीसह ताब्यात घेवुन त्यांचे तावडीतुन अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यात यश मिळाले आहे.
तसेच सदर आरोपींकडे मिळुन आलेल्या गाडीची पाहणी केली असता त्यात तीन मोबाईल फोन, ०१ छऱ्याचे पिस्टल, ०१ अडीच फुट लांबीचा कोयता, ०१ सुरा, छन्नी, हातोडा, ०२ मारक असा मुद्देमाल जप्त केला असुन त्यांचे कडे प्राथमिक चौकशी केली असता सदर आरोपी यांनी अपहरण केलेल्या मुलाचे वडीलांबाबत माहिती काढली होती की त्यांचा भंगाराचा व्यवसाय असुन त्यांचे कडे खुप पैसे आहेत. त्याचे मुलाचे अपहरण केले तर खुप पैसे मिळु शकतात त्यासाठी त्यांनी पाच दिवस सदर मुलाचे अपहरण करण्यासाठी रेकी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांना हॉटेलचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी सदर मुलाचे अपहरण केले असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. तसेच सदर आरोपींनी खंडणी मागण्याकरिता वापरलेले मोबाईल फोन हे भुमकर चौक व मारुंजी परिसरातुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन सदर आरोपींना पुढील तपासकामी हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर-१०६६/२०२३ भा.दं.वि. कलम ३६४ (अ) या गुन्हयाचे तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, मा. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री. सतिष माने, सहा. पोलीस आयुक्त, मा. श्री. हिरे, यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, दरोडा विरोधी पथक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक शिंदे, स.पो.नि., अंबरिष देशमुख, दरोडा विरोधी पथक, स.पो.नि. सिद्धनाथ बाबर, पो.उप.नि. गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, दादा पो.हवा. / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आडे, पो.ना./ वासुदेव मुंडे, सुरेश जायभाये, पो.शि./ प्रशांत सैद, सुखदेव गावंडे तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, पो.हवा. / नागेश माळी,
पोपट हुलगे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!