आर्थिकमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

कंत्राटी कामगार भरती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट रस्त्यावर

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.१४ सप्टेंबर २०२३ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून उद्योग आणि व्यापार सेल तर्फे राज्य सरकारने ‘ सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण’ आदेशाविरोधात पिंपरी चौकात डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळ्याशेजारी (भिमसष्टी येथे) निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी कंत्राटी जी.आर. च्या प्रति ‘ भाजप ‘ असे लिहिलेल्या कचऱ्याच्या डब्ब्यात फाडून फेकण्यात आल्या. या वेळी उद्योग आणि व्यापार सेल अध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे म्हणाले की या कामासाठी ९ कंत्राटदार सुद्धा फायनल केले आहे. ते सहा लाख नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत. यामुळे या कंत्राटदारांना १५००० कोटी मिळणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील म्हणाले की या जी.आर. मुळे संविधानाने दिलेला आरक्षणाचा अधिकार संपुष्टात येणार आहे. तसेच आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीला सुद्धा याचे काम देण्यात आले आहे. हा जी.आर. मागे घेण्यात यावा याची मागणी देवेंद्र तायडे, काशिनाथ जगताप आणि प्रदेश सरचिटणीस राजन नायर यांनी केली.
यावेळी सामाजिक सेल अध्यक्ष मयूर जाधव, सुदाम शिंदे, राजू खंडागळे, पोपट पडवळ, बापू सोनावणे, ॲड. सरोदे, राजेश हरगुडे, संतोष माळी, अंकुश बिरादार, रोहन वाघमारे, राहुल धनवे, निलेश पुजारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!