महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपळे सौदागर स्मार्ट सिटी अंतर्गत असून सुद्धा महावितरण विभागाचा भोंगळ कारभार कधी सुधारणार-विशाल जाधव

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२१ सप्टेंबर २०२३
विद्युत महावितरण विभाग यांना वारंवार सांगून सुद्धा असे अनुचित प्रकार घडत असतात नुकताच पिंपळे सौदागर येथील विश्वशांती कॉलनी मध्ये उघड्या वरील केबलचा धक्का लागून तीन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या तसेच मेंढपाळ थोडक्यात बचावला.
अशा घटना वारंवार घडत असताना आपण त्यातुन काही सुधारणा करणार आहात कि नाही? असा सवाल त्या ठिकाणातील नागरिक करत आहे.त्याठिकाणी मेंढ्या ऐवजी एखादा विद्यार्थी किंवा मनुष्य असता तर महावितरण विभागाने जबाबदारी घेतली असती का?
सातत्याने अशा घटना घडत असताना तुमचा विभाग असंवेदनशील झाला आहे. महावितरण महामंडळ जर यावर लवकर तोडगा काढत नसेल तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
भटक्या विमुक्त समाजातील आमचे समाज बांधव मेंढपाळ यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानाचे भरपाई विद्युत महामंडळाने त्वरित द्यावे.अन्यथा तुमच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाई विशाल जाधव शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल यांच्या वतीने देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!