अभिनंदनपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिक

प्रा. संकेत जानराव यांना “छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६” प्रदान..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०१ एप्रिल २०२६ थेरगाव (पुणे) येथील मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे भूगोल विषयाचे प्राध्यापक संकेत जानराव यांना “छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
दि. २८ मार्च रोजी मुंबई येथे छावा प्रतिष्ठान आयोजित छावा शिवकालीन बहुउद्देशीय कला मंच यांच्या वतीने भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सुप्रसिद्ध सिनेअभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते प्रा. जानराव यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुणाल दादा मालुसरे, दीपक साकोरे, डॉ. राज खतीब, विजय चौधरी, दीपक राजे शिर्के, रोहित पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. वस्ताद अमित गंडाकुश यांनी केले होते.
प्रा. संकेत जानराव हे भूगोल विषयातील अत्यंत समर्पित, अभ्यासू आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे शिक्षक म्हणून ओळखले जातात. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
या यशाबद्दल प्रा. जानराव यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याप्रसंगी मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, शिक्षण अधिकारी डॉ. अंकुश काळखैरे तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रभावती जट्टे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button