
प्रतिनिधी पेरणे पुणे दि. १५ ऑगस्ट २०२५ मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मधु तारा हवेली तालुका प्रमुख सदाशिवराव ननावरे व मधु तारा हवेली तालुका महिला प्रमुख सौ. स्वर्णलताताई ननावरे यांच्या आयोजनातून एच.व्हि. देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे यांच्या सहकार्याने निवासा सोसायटी क्लब हाऊस पेरणे गाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरा मध्ये सोसायटीतील रहिवासी तथा गावातील असंख्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नेत्र तपासणी केली तसेच अनेक जणांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी नावे रजिस्टर करण्यात आली. या वेळी अत्यंत अल्प दरात हॉस्पिटलच्या माध्यमातून चष्मे वाटप करण्यात आले.
लोकहिताच्या मधु ताराच्या शिबिरास मधु तारा सोबती शिक्रापूर पुणे येथील राजा शिव छत्रपती निवासी मतिमंद मुलांची शाळेचे नीलेशजी जगताप, लोणी काळभोर पुणे येथील दयावान सेवाभावी संस्थेचे सिद्धेश्वरजी कवडे, लक्ष्मणजी चव्हाण, लक्ष्मणजी कांबळे, तसेच पेरणे फाट्याचे मधु ताराचे व्हीलचेअर लाभार्थी संभाजी सोमवारे सर यांनी उपस्थित राहून मधु ताराच्या कार्यासाठी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
या वेळी मधु तारा हवेली तालुका प्रमुख यांच्या वतीने उपस्थित मान्यवराना तसेच हॉस्पिटल टीमला शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी मधु तारा प्रमुख नितीनजी शिंदे यांनी शिबिरास आलेल्या सर्व मान्यवरांचे हॉस्पिटल टीमचे विशेष करून एच. व्ही. देसाई, हॉस्पिटलचे दिनेश सर यांचे सहकार्याबद्दल आणि निवासा सोसायटीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत मधु ताराचे हवेली तालुका प्रमुख ननावरे दांपत्याचे शिबिर नियोजनासाठी अभिनंदन केले.



