भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी पिंपरी येथे मोठ्या उत्साहात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ जानेवारी २०२४ कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ सावंत सर एक्स कमांडो,
प्रमुख उपस्थिती मा. चंचलसिंग नेगी- डिफेन्स लिग फोरमचे कार्यकरणी सदस्य सचिव, मा. अण्णासाहेब बोदडे सहाय्यक आयुक्त पिं.चि मनपा, मा. प्रफुल पूराणिक सर जनसंपर्क अधिकारी पिं.चि.मनपा, कनिष्ठ अभियंता मा. चंद्रकांत कुंभार सर, मा. पी. एस.आय रामनाथ पालवेसर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
एक्स पाराकमांडो रघुनाथ सावंत सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले राष्ट्रगीत झाल्यानंतर
मा. प्रफुल पौराणिक जनसंपर्क अधिकारी पिं चि मनपा यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले.
तसेच पुढील मान्यवरांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
मा. अण्णा साहेब बोदडे सहाय्यक आयुक्त पिं चि मनपा तथागत ग्रुप सदस्य मा. प्रफुल पूराणिक जनसंपर्क अधिकारी पिं चि मनपा, मा. पी एस आय रामनाथ पालवे, राजन नायर, धंम्मराज साळवे रयत विद्यार्थी विचार मंच, संतोष जोगदंड सामाजिक कार्यककर्ते, राजू भालेराव तथागत ग्रुप सदस्य, लेणी प्रेमी इतिहास प्रेमी यांनी शुभेच्छा दिल्या व सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणार्या मान्यवरांचा संविधानाची एद्देशिका देऊन संम्मानित करण्यात आले, या कार्यक्रमाची प्रस्तावना अशोक बडेकर यांनी केली व सुत्रसंचालन राजू भालेराव यांनी केले,
कार्यक्रमाचे आयोजक डिफेन्स फोर्स लिग, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौध्द समाज विकास महासंघ, रयत विद्यार्थि विचार मंच, बुध्द लेण्या मुक्ती आंदोलण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लेणी प्रेमी इतिहास प्रेमी मनोज गजभार, रवि कांबळे, महायान मसुरे, राजू भालेराव, प्रियाताई शेख, रोहिणीताई लादे, मंदाकिनी गायकवाड, तसेच डिफेन्स लिग फोरमच्या महिला भगीणी व विशाल विसपुते यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व उपस्थित नागरिकांनी खुप छान प्रतिसाद दिला त्याच प्रमाणे आनंद व्यक्त करण्यासाठी मिठाई वाटली.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने विशेष सहकार्य केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी उर्स्फुत असा प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी केला.







