गुरुवार दि. ०५/१०/२०२३ रोजी शहराचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० सप्टेंबर २०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पाणीपुरवठा विभाग जाहीर निवेदनाद्वारे प्रसिध्द करत आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडील पाणीपुरवठा विभागाच्या से.क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवार दि. ०५/१०/२०२३ रोजी पिंपरी चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमीत वेळेनुसार होणार असुन संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे शहरातील
सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. ०६/१०/२०२३ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा हा अनियमीत व कमी दाबाने होईल. तरी सर्व नागरिकांनी महानगरपालिके कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे निवेदन सह शहर अभियंता पाणीपुरवठा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पिंपरी- १८. यांचे वतिने प्रसारित करण्यात आले आहे.




