महाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन शाळेत साचलेल्या पाण्यात विद्यार्थ्यानां उभे राहून करावे लागते..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १७ ऑगस्ट २०२६ राज्याला लाजीरवाणी गोष्ट भारताला स्वातंत्र्य मिळून ८० वर्ष झाले पण परिस्थिती अत्यंत भयानक शाळकरी मुलांना झेंडा वंदन पाण्यात उभे राहून करावे लागले मग प्रश्न पडतो खरच भारत महासत्ता व विश्वगुरु बनणार का? की फक्त तोंडसुख.. विडीओ सर्व मिडीयावर व्हायरल झाल्यावर अनेकांनी सरकार व प्रशासनाला ट्रोल केले.
अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेत साचलेल्या पाण्यात उभे राहून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन केले.
देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र गुडघाभर पाण्यात उभे राहून ध्वजवंदन करण्याची वेळ आली. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना पाण्यातच उभे राहावे लागले. तिरंग्याला सलाम करताना विद्यार्थ्यांच्या पायाखाली चिखल आणि पाणी असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. त्यामुळे या शाळेतील पायाभूत सुविधांची अवस्था किती बिकट आहे, याची कल्पना येते.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या परिसरात पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यासाठी असलेली जागा अडवण्यात आल्याने ही समस्या निर्माण होत आहे. परिणामी पावसाळ्यात पाणी शाळेच्या परिसरात साचते. गेल्या २५ वर्षांपासून ही समस्या कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून शाळेत ये-जा करावी लागते. मात्र, एवढ्या प्रदीर्घ काळापासून समस्या कायम असतानाही तिच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. सद्य परीस्थितीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button