माहितीच्या अधिकाराच्या वापरानंतर विकासकामांना गती व आहिरेंकडून ग्रामपंचायत बेळगाव पाडे यांची मागील पाच वर्षाच्या विकास कामाची वरिष्टांकडे चौकशीची मागणी..
प्रतिनिधी बेळगाव पाडे दि. ११ मार्च २०२४ माहितीच्या अधिकाराचे उत्तर न मिळाल्यामुळे बहुजन एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य सचिव योगेशभाऊ आहिरे यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देताच जोरदार विकास काम करण्यास सुरवात करण्यात आली आहे.
सदर कामाचा आढावा या आधी ग्रामसभेमध्ये योग्य पद्धतीने ग्रामस्थांनपुढे सांगण्यात येत नव्हता. मागील पाच वर्षात मनमानी कारभार चालत असल्याचे बहुजन एकता आंदोलन संघटना सचिव आहिरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
सदर बेळगाव पाडे ग्रामपंचायत येथे २९ डिसें-२०२३ रोजी माहितीच्या अधिकारातुन आहिरे यांनी मागील ०५ वर्षाचा गावातील विकास कामाचा व शासकीय निधी जमा व खर्च याचा तपशील मागितला होता. आज रोजीही याचा तपशील आहिरे यांना ग्रामपंचायत बेळगाव पाडे यांच्याकडून मिळालेला नाही पण तपशील न मिळाल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत बेळगाव पाडे येथील शासकीय अधिकारी व सत्ताधारी सदस्य यांना बहुजन एकता आंदोलन संघटनेकडून आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे जोरदार विकास काम चालू झाल्याचे चित्र दिसत आहे.
आहिरे यांच्याकडून असे सांगण्यात येते कि विकास कामाची विचारना करत असतांना उडवाउडावीचे उत्तर देण्याचे काम यांच्या कडून सातत्याने होत आहे. सदर सूरू असलेल्या कामांचा निधी हा चालू वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये मिळाल्याचे ग्रामसेवक सो यांच्याकडून सांगण्यात आले आहे विकास कामासंदर्भात योग्य माहिती दिली जात नसल्याने व ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकाराचे बोर्ड लावणे बंधनकारक असल्याने यांनी असे कुठलेही बोर्ड लावलेले नाही.
सदर ग्रामपंचायत कार्यालयात इतर ही शासकीय नियमानुसार अनेक बोर्ड नसल्याने यांच्याकडून शासकीय नियमांची पायमल्ली होत आहे हे शासनाचे कुठलेही नियम पाळत नसल्या कारणाने आपण आंदोलनावर ठाम असल्याचे बहुजन एकता आंदोलन संघटनेकडून सांगण्यात येत आहे.
लवकरच आंदोलनाची तारीख ठरविण्यात येणार असल्याचे आहिरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.