
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ ऑक्टोंबर २०२३ काल दि. १२ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी भिमसृष्टी पिंपरी चौक येथे बहुजन एकता आंदोलनची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी मीटिंगचं महत्व आणि उद्देश म्हणजेच महाराष्ट्रामधील शाळाचे व सरकारी नोकरी खाजगीकरण संदर्भात मीटिंग घेण्यात आली आहे. असे सांगीतले व या संदर्भात १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आला आहे असे सांगण्यात आले. या बैठकीला संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पवार, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्रीकृष्ण वाघ, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सूर्यवंशी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक वानखडे, शहर उपाध्यक्ष रवी कांबळे, शहर सचिव राहुल भोसले, शहर सचिव अनिल शिंदे, विधानसभा सचिव प्रवीण त्रिभुवन, व बहुजन एकता आंदोलनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.



