महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

रेंजहिल्स ख्रिश्चन युथ असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चर्चा सत्राचे आयोजन.. मा. राजन नायर.

प्रतिनिधी पूणे दि. १६ ऑक्टोंबर २०२३ रेंजहिल्स ख्रिश्चन युथ असोसिएशनच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त राजन नायर यांना संघटनात्मक कार्याबद्दल समाजाचा भविष्यातील वेध यांवर विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते व मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन श्री.सुधीर हिवाळे आणि मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे, श्री शामशुद्दीन तांबोळी, आमदार सिध्दार्थ शिरोळे,बिशप साकरपेकर, बिशप नादर श्री अशोक आंग्रे, श्री. आशिष जाधव, श्री. बाजीराव दळवी, श्री. जोजफ राजू ख्रिस्ती, पास्टर रूपसिंग, श्री. सॅमसन जाधव, श्री. डेव्हिड काळे, पास्टर बेंजमीन काळे, पास्टर अनिल साळवे, पास्टर सुनंदा त्रिभुवन, डाॅ.पवार व त्याचप्रमाणे विविध साहित्यिक, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.श्री. सुधीर हिवाळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान दिले आहे व त्याचबरोबर त्यांच्या सहकार्याने देखील योगदान दिले आहे. यावेळी अनेक समाज उपयोगी विषयांवर व्याख्याने झाली.राजन नायर यांनी आपले मत व्यक्त करताना ख्रिस्ती समाजात असणारा व्यक्तीभेद, मतभेद यामुळे होणारे समाजाचे नुकसान, ख्रिस्ती तरूणांच्या समोर असलेल्या समस्या, राजकीय क्षेत्रात भक्कम नेतृत्व व सामाजिक बांधिलकी असणे आवश्यक आहे, राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्यात आत्मविश्वास व समाजाचा पाठिंबा याबाबत कमतरता, त्याचप्रमाणे ख्रिश्चन समाजाने येणार्‍या निवडणुकीत सहभागी व्हावे व ख्रिश्चन समाजात स्वतः योगदान देऊन समाजासाठी संघटन, ऐक्य तयार करणारे नेतृत्व निवडून सामाजिक एकता तयार करावी असे विचार त्यांनी व्यक्त केले. राजन नायर यांनी रेंजहिल्स ख्रिश्चन युथ असोसिएशनच्या कार्याबद्दल उल्लेखनीय प्रतिक्रिया देत बोलले की, ते जे समाजाला एकजूट व अशा कार्यक्रम व्दारे प्रोत्साहीत करत आहेत ते प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे.रेंजहिल्स ख्रिश्चन युथ असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुधीर हिवाळे आणि त्यांच्या पूर्ण टिम ने समाजातील सर्व धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान केला याबद्दल श्री. राजन नायर यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेविका व समाजाच्या नेत्या डाॅ. सौ .स्नेहल पाडळे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!