गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मिञाचा खुन करुन बॉडी नाल्यात फेकुन दिल्याचे वाकड पोलीसांनी केले उघड दोन आरोपींना केले गजाआड..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ ऑक्टोंबर २०२३ थेरगाव परीसरातील इसम नामे सुरज ऊर्फे जंजीर कांबळे वय ३० वर्षे रा.जगतापनगर लेन नं ५ थेरगांव पुणे हा मिसिंग असलेबाबत त्याची पत्नि आरती सुरज कांबळे यांचे तक्रारीवरुन वाकड पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसिंग क्र. २८४/२०२३ प्रमाणे दि.०७/ १० / २०२३ रोजी मिसिंग दाखल करण्यात आली.
सदरचा इसम मिसींग झाले पासुन त्याचे बाबत कोणतीही माहीती मिळत नव्हती. दि. ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी आरती सुरज कांबळे यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात मिसींग इसम सुरज कांबळे हे त्यांचे मित्र पंकज पाचपिंडे यांचे सोबत दारु पिणेसाठी गेले होते त्यानंतर ते परत घरी आले नसलेबाबत माहीती प्राप्त झाली. पंकज पाचपिंडे हा मिसींग तक्रार दाखल झालेनंतर त्याचा फोन बंद करुन कोठेतरी निघुन गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर मिसींग मध्ये काहीतरी गंभीर घटना घडली असावी हे ओळखून मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील स.पो.नि. संतोष पाटील, पो.उप.नि. सचिन चव्हाण यांना सोबतचे पोलीस अंमलदारांसोबत मिसींग व्यक्तीचा सर्वोतोपरी शोध घेणेबाबत आदेश दिले.
त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार मिसींग व्यक्तीचा व त्याचे सोबत असणारे पंकज पाचपिंडे याचा शोध घेत असताना अशी माहीती प्राप्त झाली की, मिसींग इसम, पंकज पाचपिंडे व त्यांचा मित्र अमरदिप ऊर्फे लखन जोगदंड असे दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२३ रोजी दारु पिणेसाठी थेरगाव मध्ये बसले होते. त्यानंतर सुरज कांबळे हा घरी परत आलेला नाही. पंकज पाचपिंडे व अमरदिप ऊर्फे लखन जोगदंड हे वाकड पोलीस स्टेशन येथे मिसींग दाखल झालेनंतर कोठेतरी निघुन गेले असल्याचे माहीती प्राप्त झाली. त्यामुळे तपास पथकाने तांत्रीक विश्लेषण व पारंपारीक तपास पध्दतीने तपास सुरु केला असता माहीती भेटली
की, १) पंकज रतन पाचपिंडे वय २८ वर्षे रा. जय मल्हार कॉलनी नं ५ थेरगांव पुणे २) अमरदिप ऊर्फे लखन दशरथ जोगदंड वय- ३३ वर्षे रा. म्हातोबा बारणे यांची खोली, चांदनी चौक, थेरगाव गावठाण, थेरगांव, पुणे. मुळपत्ता मु.पो आंबेजोगाई, साठे नगर, परळीवेस्ट, बीड हे बिड जिल्हयात लपुन बसले आहेत. त्यामुळे मा. वरिष्ठांचे परवानगीने तात्काळ एक पथक बिडला रवाना करुन दोन्ही संशयीत इसमांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन तपास केला असता त्यांनी सांगीतले की, दि. ०५ / १० / २०२३ रोजी सुरज कांबळे, पंकज पाचपिंडे व अमरदिप ऊर्फ लखन जोगदंड असे तिघेजण पंकज पाचपिंडे राहत असलेल्या जय मल्हार कॉलनी नं. ०५ थेरगाव पुणे येथील घरात दारु पित बसले असताना, सुरज कांबळे याने आई बहीणीवरुन घाणेरडया शिवीगाळ केल्याने रागाचे भरात पंकज पाचपिंडे व अमरदिप ऊर्फ लखन जोगदंड यांनी चाकुने सुरज कांबळे याचे गळयावर वार करुन त्याचा खुन केला. त्यानंतर आरोपी पंकज पाचपिंडे चालवित असणारा तिनचाकी टेम्पो मध्ये सुरज कांबळे याची बॉडी एका गोधडीत गुंडाळुन बावधन येथील गायकवाड वस्ती मधील हायवे खालील नाल्यात टाकुन दिली. त्यानंतर ते दोघे काही घडले नाही अशा अविभावात दोन दिवस आपले नियमीत काम करीत होते.
सुरज कांबळे याचे पत्निने दि. ०७/१०/२०२३ रोजी मिसींग तक्रार दाखल केले नंतर पंकज पाचपिंडे हा सुरज कांबळे याचे पत्निस घरी जावुन भेटुन सुरज हा दि. ०५/१०/२०२३ रोजी त्याचे सोबत दारु पिणेस होता. परंतु दारु पिले नंतर रात्री ०१.०० वा सुमा. तो घरी परत गेला आहे अशी हकीकत सांगीतली. त्यामुळे सुरवातीला आरती कांबळे यांना पंकज पाचपिंडे याबाबत कोणतीही शंका निर्माण झाली नाही. परंतु पंकज पाचपिंडे व अमरदिप ऊर्फे लखन जोगदंड यांना पोलीस तपासात आपले पर्यंत पोहोचणार याची भिती निर्माण झालेने, ते दि.०८/१०/२०२३ रोजी पासुनच पुण्यातुन निघुन गेले होते. मनुष्य मिसींगचे झाले तपासावरुन तपास अधिकारी पो.उप.नि. सचिन चव्हाण यांचे फिर्यादीवरुन वाकड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १००८/२०२३ भा. द. वि. क्र. ३०२, २०१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला. सदर गुन्हयात दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांचेकडे विश्वासात घेवून चौकशी करुन आरोपीनी मयत सुरज कांबळे यांची बॉडी ज्या ठिकाणी टाकली होती ते ठिकाण शोधुन बॉडी ताब्यात घेणेत आलेली आहे. सदर मयतावर ससुन हॉस्पीटल पुणे येथे पोस्टमार्टम करणेत आले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहे.
एकंदरीत तीन चांगले मिञ दारु पित बसले असताना शिवीगाळ केलेचे किरकोळ कारणावरुन त्यांचेत वाद होवुन त्यांनी मिञाचा खुन केला आहे. तसेच खुन केले नंतरही खुन लपविणेसाठी त्याची बॉडी नाल्यात टाकुन आपले नियमीत काम करीत होते. तसेच पोलीसांना आपले बाबत माहीती मिळेल याची जाणीव झालेवर फोन बंद करुन अंबाजोगाई जि.बिड येथे जावुन आपले अस्तित्व लपवुन बसलेल्या दोन आरोपींना वाकड पोलीसांनी अटक केली आहे. अटक आरोपींना दिनांक २४/१०/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी प्राप्त असून पूढील तपास सूरू आहे.
सदरची कारवाई श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, श्री. डॉ. संजय शिंदे सह. पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, श्री. डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप. आयुक्त परि २ पिंपरी चिंचवड, श्री.डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे) स.पो.नि., संतोष पाटील पो.उप.नि. सचिन चव्हाण स.पो.फौ., बाबाजान इनामदार पो.हवा. संदीप गवारी, पो.हवा. स्वप्निल खेतले, पो.हवा. दिपक साबळे, पो.हवा. अतिश जाधव, पो.हवा. प्रमोद कदम, पो.ना. प्रशांत गिलबीले, पो.ना अतिक शेख, पो.ना. विक्रांत चव्हाण, पो.ना. राम तळपे, पो.शि. अजय फल्ले, पो.शि. भास्कर भारती, पो.शि. स्वप्निल लोखंडे, पो.शि सौदागर लामतुरे, पो.शि. कौंतेय खराडे, पो.शि. विनायक घारगे, पो.शि रमेश खेडकर, पो.शि. सागर पंडीत (परि – ०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!