उघडे दरवाजावाटे घरात प्रवेश करुन मोबाईल चोरणार्या चोरटयांना अटकआरोपींकडुन किं.रु.१७,००,०००/- चे ३५ महागडे मोबाईल जप्तवाकड पोलीसांची कामगिरी.
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६/१०/२०२३ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात दिवसा चोरीबाबत श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त पोलीस अंमलदार नेमुन सकाळचे सत्रात सतर्क पेट्रोलींग व सक्त नाकाबंदी करुन संशयीतरित्या फिरणारे लोकांना ताब्यात घेवून चो-यांवर आळा घालणेबाबत आदेश दिले आहेत.
श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील स.पो.नि. संतोष पाटील, पो.उप.नि. सचिन चव्हाण यांना सोबतचे पोलीस अंमलदार यांना पारंपारीक व तांत्रीक तपासाद्वारे दिवसा चोरी करणारे रेकॉर्डवरील चोरटयांचा शोध घेवून त्यांना अटक करुन गुन्हे उघड करणेबाबतसुचना दिल्या आहेत.
त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार असे सकाळचे सत्रात होणारे चोरीच्या अनुषंगाने सिसीटीव्हीचे आधारे तपास करीत असताना एक इसम व एक महीला दोघांचे वय अंदाजे २० वर्षे असे चोरी करणारे संशयीत असल्याचे दिसुन आले. त्यादृष्टीने तपास सुरु केला असताना पो.ना. प्रशांत गिलबीले यांना विश्वासु बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सिसीटीव्ही मधील संशयीत इसम हा ताथवडे भागातील बालाजी लॉ कॉलेजवळ येणार आहे. अशी बातमी मिळालेने सदर ठिकाणी जावुन सिसीटीव्ही फुटेज मधील संशयीत इसम आले
नंतर त्यास ताब्यात घेवून नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव १) कन्हैयालाल चेलाराम नटमारवाडी वय २० वर्षे रा. अमर पंजाबी ढाव्याचे मागे, वडगाव मावळ ता.मावळ जि.पुणे मुळ रा.शास्त्री नगर, जवाहरनगर, ता. जि. नडीयाद राज्य गुजरात असे सांगीतले त्यास पोलीस स्टेशन येथे आणुन झडती घेतली असता त्याचेकडे ०२ मोबाईल मिळुन आले. त्यामुळे त्याच्या साथीदार महीलेचा शोध घेवुन तीस ताब्यात घेतले असता तीचेकडे देखील ०२ मोबाईल मिळुन आलेने त्यांना अटक करुन एकत्रीत तपास केला असता आरोपींनी दाखल गुन्हयाव्यतिरीक्त चिंचवड, निगडी, खडक, भारती विद्यापीठ असे पोलीस स्टेशनचे मिळुन एकुण ०६ गुन्हयांची कबुली देवुन गुन्हयातील चोरलेले किं.रु. १७,००,०००/- चे एकुण ३५ महागडे मोबाईल त्यांचेकडुन जप्त करणेत आले आहेत. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.श्री.डॉ. संजय शिंदे साो, सह. पोलीस आयुक्त, मा.श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ.काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड, मा. श्री.डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी
चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा.श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि. सचिन चव्हाण, सपोफो. बाबाजान इनामदार, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि.सौदागर लामतुरे, पोशि. कौंतेय खराडे, पोशि रमेश खेडकर, यांनी मिळुन केली आहे.