अभिवादनउत्सवदेश-विदेशपिंपरी चिंचवड मनपा.महाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छाशैक्षणिकसामाजिक

मानवतावादी महामानवांचे ११ एप्रिल ते १४ एप्रिल वैचारिक प्रबोधन पर्वात मोफत पिण्याचे पाणी जयंती काळात वाटप करुन पर्व साजरे करण्यात आले-प्रा. बी. बी. शिंदे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ एप्रिल २०२५ महामानव क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांचा १९८ वा व विश्वरत्न, बोधीसत्व प. पु. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचा १३४ वा जयंती सोहळा पिंपरी चिंचवड शहरातील भिमअनुयाया सोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी ११ एप्रिल ते १६ एप्रिल हा सप्ताह महामानवांच्या विचारांचे प्रबोधन पर्व म्हणून “भीमसृष्टी” डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई पुणे रोड पिंपरी पुणे ४११०१८ येथे साजरा करण्यात आला.
या वेळी ११ एप्रिल २०२५ रोजी क्रांती सूर्य महात्मा जोतीराव फुले व १४ एप्रिल २०२५ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला भिमरत्न, प्रा. बी. बी. शिंदे संस्थापक/अध्यक्ष सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना महा. राज्य. यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की या महामानवांचा जन्मोत्सव आपण प्रबोधन पर्व म्हणून अनेक वर्षांपासून साजरा करत आहोत. महामानवांच्या पश्चात त्यांच्या ध्येय उधिष्टा प्रती आपण कितपत मार्गक्रमण करत समाजाप्रती बांधील राहून कार्य करत आहोत हे पहाण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या प्रबोधन पर्वाचे (जयंतीचे) उत्साहात कार्यरत असणार्‍या कार्यकर्ते व नेते यांचे खऱ्याअर्थाने लेखा जोखा परिक्षण ( आडिट ) आहे. त्यासाठी प्रतेक समाजातील कार्यकर्ते व नेते म्हणून घेणाऱ्या प्रत्येकानी समजा प्रती बांधील राहून, समता वादी महामानवाला अभिप्रेरित असणारेच काम करत रहावे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य रक्षणार्थ ताराराणींचे सहकारी सरदार संताजी – धनाजी यांची इतिहासात नोंद आहे. तसेच फुले शाहू आंबेडकर, आण्णा भाऊ यांच्या मानवतेच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी सध्यातरी आमच्या समोर दोनच कार्यकर्ते (पालिकाकर्मी) दिसत आहेत. एक भीम गीत आठवते त्याच्या चारओळी प्रमाणे ” दोनच राजे इथे गाजले कोकण पून्य भूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर” असेच या दोन अधिकार्‍यां संदर्भात बोलावेसे वाटते दोनच अधिकारी या पालिकेत पिंपवड कार्यभूमीवर एक उपायूक्तपदावर एक विशेष अधिकारी पदावर’ किरण-अण्णा यांचे शिवाय दुसरे कोणीही दिसत नाही. यांना खऱ्या अर्थाने साथ दिली पाहिजे.

या प्रबोधन पर्वात १४ एप्रिल दिनी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना व रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर या दोन्ही संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या प्रबोधन पर्व सोहळ्यामध्ये भिमअनुयायांना पिण्याचे पाणी मोफत वाटण्याचा स्टॉल लावण्यात आला. या स्टॉलचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचे कर्तव्यदक्ष विशेष अधिकारी मान्यवर किरणजी गायकवाड व त्यांचे सहकारी मा. प्रफुल्ल पुराणिक, कामगार नेते मा. गणेश भोसले, मा. दिपक म्हस्के यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष मान्यवर दत्ताभाऊ गायकवाड यांनी मान्यवर किरणजी गायकवाड, मा.प्रफुल्ल पुराणिक, गणेशजी भोसले, यांचा पूष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ विचारवंत व मार्गदर्शक मान्यवर मानवजी कांबळे, माजी नगरसेवक व या शहरांचे मार्गदर्शक मारुती भापकर, या सर्वांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मार्गदर्शक भिमरत्न प्रा. बी. बी. शिंदे, राज्य उपाध्यक्ष मा. आशोक जावळे, राज्य सचिव मा. सचिन वाघमारे, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष, लक्ष्मणजी रोकडे ( जेष्ठ विचारवंत व जेष्ट पत्रकार मूकनायक न्युज पेपर) मा. मोहन गायकवाड, मा.गजानन पोमने, तसेच या सामाजिक संघटनेचेमा. उत्तम कांबळे, मा.मेहबूब शेख.
तसेच महाराष्ट्रातील फुले आंबेडकर चळवळीतील सुप्रसिद्ध गान कोकीळा आयु. साधनाजी मेश्राम यांचा सत्कार करताना रिपब्लिकन सेनेचे प्रमुख मा. रंजीत होबाळे व त्यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी मा. ॲड. बाबासाहेब वाघमारे, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या महिला नेत्या आयु. सावित्रीबाई शिंदे रिपब्लिकन सेनेचे नेते रमेश कांबळे, मा. नरेंद्र बनसोडे, प्रा.युवराज तिकटे, मा. माऊली बोराडे, मा. सुमीत्रा मस्के, धर्मराज जगझाप, मा. कवी गायक गोविंद गाडे, मा.रत्नाताई गायकवाड, मा. सुधाकर इंगळे, पँथर राजाभाऊ सरवदे, बाळासाहेब गायकवाड अध्यक्ष गरिबी निर्मूलन समिती, जोगदंड, लेणी मुक्ती आंदोलनाचे प्रमुख मा. मनोज गाजभार, मा. मुकुंद रणदिवे, मा. राजू गायकवाड, यांनी रिपब्लिकन सेनेच्या वतिने कार्यक्रम स्थळी सोहळ्यादरम्यान मोतीचूर लाडूच्या मिठाईचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!