
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४एप्रिल २०२५ क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्वप्नकुंज ग्रृहरचना सहसोसायटी D ६ चिखली येथेल रहिवाशी मा. हनुमंत जगताप यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व अतुल जाधव यांनी डाॅ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण केला यानंतर सामूहिक बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ॲड. महेंद्रकुमार गायकवाड यांनी महात्मा फुलेवर बोलताना सांगितले कि महात्मा फुलेंनी पुणे, हडपसर, सांगली ओतूर, सासवड, नायगाव सातारा, तळेगाव, शिरूर, अंजिरवाडी, माजगाव , करंजे, सातारा, भिंगार, मुंडवे, नानापेठ, रास्ता पेठ, वेताळ पेठ अशा एकुण १८ शाळा त्यावेळी सूरू केल्या होत्या. आताच्या लुटारू शिक्षण संस्था चालवणारांनी हे लक्षात घ्यावे कि आपन कसलं सामाजिक कार्य करतोय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य हे स्वातंत्र्याच्या नंतर पासून ते पुढच्या कित्येक पिढ्यांना सुरक्षा स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधान निर्माण केले. ज्यामुळे देशातील सर्व समाजाच्या धर्माच्या कल्याणासाठी व सुरक्षिततेसाठी कायदा बनवून दिला. बाबासाहेबांची जयंती पुर्ण जगभरात साजरी केली जाते. जगाने बाबासाहेबांना “ ज्ञानसुर्य अर्थात “ (Symbol of Knowledge) म्हटले आहे असे आपल्या मनोगतात गायकवाड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल अवचार, राजु चौधरी, दातकर, अनिल कदम, मताप आखाडे, सावंत, सुखदेव खिलारे, यवतकर, शिवशंकर, जाधवताई, चौधरीताई, जगतापताई, अवचारताई, इंदवेताई, मंगल पाचपुते, मर्डेकर तसेच संपूर्ण स्वप्नकुंज परीवाराने हर्षोल्हासात आनंदाने उपस्थित राहून जयंती साजरी केली. शेवटी विजय जगताप यांनी आभार मानले.



