
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ ऑक्टोंबर २०२३ आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा पूण्यातून सूरू होणार आहे. म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा (शरद पवार गट) या रॅलीत सामिल होण्याकरीता पिंपरी चिंचवड मधून पाठिंबा देण्याकरिता पाचशे बाईकची रॅली काढण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष तुषार कामठे यांनी पिंपरी वाघेरे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून बाईक रॅलीला सुरवात केली. नंतर ही रॅली पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुढे दापोडीवरून लाल महाल येथे गेली. तिथे रॅली युवा संघर्ष यात्रेला जाऊन सामील झाली.
यावेळी देवेंद्र तायडे, राजन नायर, काशिनाथ जगताप, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, राहुल आहेर, सुलक्षणा धर, गणेश भोंडवे, पोपट पडवळ, योगेश सोनावणे, सुदाम शिंदे, ॲड. संतोष शिंदे, अनिल भोसले, संदीप चव्हाण आदी उपस्तिथ होते.






