ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत प्रा. हरी नरके यांच्या स्मरणार्थ चिंचवड येथे श्रद्धांजली सभा संपन्न झाली.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट २०२३ ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत प्रा. हरी नरके यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली सभा संपन्न झाली. त्यांच्या कार्याला व आठवणींना उजाळा देताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
चिंचवड येथील कै. आनंदीबाई डोके सभागृहात श्रद्धांजली सभा संपन्न झाली. प्रा. हरी नरके हे टेल्को या कंपनीत नोकरीला असल्यामुळे जवळपास दहा ते पंधरा वर्षे त्यांचे वास्तव्य पिंपरी-चिंचवड शहरामध्ये होते. त्यामुळे या श्रद्धांजली सभेसाठी मोठ्या संख्येने प्रा. हरी नरके यांचे सर्व जुने कामगार सहकारी आणि चळवळीतील विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी मानव कांबळे, मारुती भापकर, प्रताप गुरव, संतोष लोंढे, ह.भ.प. महादेव महाराज भुजबळ, काळूराम गायकवाड, विजय लोखंडे, हनुमंत माळी, मच्छिन्द्र दरवडे, राजेंद्र राजापुरे, ॲड. निलेश डोके, नरेंद्र बनसोडे, प्रदीप पवार, विशाल जाधव, काशिनाथ नखाते, सतीश काळे, प्रवीण कदम, धनाजी येळकर पाटील, हिरामण भुजबळ, नेहूल कुदळे, गिरीश वाघमारे, सुरेश गायकवाड, उमेश म्हेत्रे, सुधाकर फुले, विजय दर्शिले, अशोक मगर, पांडुरंग महाजन, ईश्वर कुदळे, नकुल महाजन, अश्विनी सातव-डोके, तुळशीदास शिंदे, कमलाकर दरवडे, मंगेश ससाने, नारायण भागवत, आनंदा कुदळे, बापूसाहेब गायकवाड, भाऊ अनारसे, अशोक मगर, राजेंद्र करपे, सुवर्णा रायकर, सायुजता दोडके, प्रतिभा दिवे, ॲड. विद्या शिंदे, वंदना जाधव, सदानंद फुले, सचिन औटी, शिवदास महाजन असे विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिवंगत प्रा. हरी नरके यांच्या पत्नी सौ. संगीता नरके आणि कन्या प्रमिती नरके या सुद्धा यावेळी उपस्थिती होत्या.
माझ्या बाबांचे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कामगार सहकारी, चळवळीतील कार्यकर्ते, मित्र यांचे माझ्या बाबांविषयी सांगितलेल्या भावुक आठवणी ऐकून माझे मन खूप भरून आलेले आहे, आपण सर्वांनी त्यांचे काम पुढे घेऊन जाऊया असे प्रा. हरी नरके सरांची कन्या प्रमिती नरके यांनी सांगितले.
प्रा. हरी नरके सरांच्या विचारांचा व कार्याचा वारसा आपण सर्वांनी पुढे नेला पाहिजे असे मानव कांबळे म्हणाले.
तसेच, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी प्रा. हरी नरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा घेण्याचा संकल्प शहराध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भुजबळ यांनी बोलून दाखविला.
या श्रद्धांजली सभेचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, नागरी हक्क समिती, बारा बलुतेदार महासंघ, माळी महासंघ, ओबीसी संघर्ष समिती, महात्मा फुले मंडळ यांच्या वतीने करण्यात आले.




